VIDEO | ऐका शरद पवारांची जीवनकथा… आनंद शिंदेंच्या खर्ड्या आवाजात पवारांचे म्युझिकल चरित्र

'शरद पवारांची जीवनकथा' या अल्बममुळे पवारांची चरित्रकथा संगीत स्वरुपात जनतेला ऐकता येणार आहे. (Sharad Pawar Sahebanchi Jeevankatha)

VIDEO | ऐका शरद पवारांची जीवनकथा... आनंद शिंदेंच्या खर्ड्या आवाजात पवारांचे म्युझिकल चरित्र
शरद पवारांच्या जीवनकथा अल्बममधील दृष्य
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 7:29 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे समर्थक फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरले आहेत. शरद पवारांच्या जीवनगाथेबद्दल सर्वांना माहिती व्हावी, यासाठी ती संगीत स्वरुपात सादर करण्यात आली आहे. प्रख्यात लोकगायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या खर्ड्या आवाजात या जीवनगाथेचे (Sharad Pawar Sahebanchi Jeevankatha) नुकतेच लोकार्पण करण्यात आले. (Sharad Pawar Sahebanchi Jeevankatha Musical Biography Album ft Anand Shinde launched)

“थोर ज्यांची विद्वत्ता, राबले जे जनहिता, ऐका शरद पवारांची जीवनकथा” अशी गाण्याची सुरुवात आहे. ही जीवनगाथा प्रख्यात गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात ऐकायला मिळणार आहे. लोकप्रिय गीतकार एकनाथ माळी (Eknath Mali) यांनी गीते लिहिलेली आहेत. तर संगीतकार डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे (Utkarsh Shinde) यांनी ती संगीतबद्ध केली आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ हे शरद पवार यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झालेले आहे. भारतातील एका अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेत्याचे राजकीय आत्मचरित्र म्हणून या पुस्तकाकडे पाहिले जाते. परंतु ‘शरद पवारांची जीवनकथा’ या अल्बममुळे ते संगीत स्वरुपात जनतेला ऐकता येणार आहे.

(Sharad Pawar Sahebanchi Jeevankatha)

फडणवीसांच्या वक्तव्याचा गाण्यातून समाचार

आनंद शिंदे यांनी मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालेल्या भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. त्यांच्या सभेआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला होता. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा इशारा आनंद शिंदेंनी दिला होता.

आनंद शिंदेंची राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातील 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सादर केली होती. यामध्ये राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे यांचं नाव देण्यात आलं आहे. आपल्या खर्ड्या आवाजाने मैफिली गाजवणारे शिंदे आता विधीमंडळातही आवाज उठवताना दिसतील. मात्र या यादीवर अद्याप राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलेले नाही.

संबंधित बातम्या :

पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय, आनंद शिंदेंचा फडणवीसांना गाण्यातून टोला

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव

(Sharad Pawar Sahebanchi Jeevankatha Musical Biography Album ft Anand Shinde launched)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.