AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही, शरद पवारांचा विरोधकांना इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं.

82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही, शरद पवारांचा विरोधकांना इशारा
शरद पवारImage Credit source: TV9 Marathi YouTube
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 4:13 PM
Share

उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त आज उस्मानाबाद दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी येथील कार्यक्रमात बोलताना विविध मुद्यावर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) झालेलं पक्षांतर, उस्मानाबादचा पाणी प्रश्न, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावर शरद पवारांना टोले मारले. तर, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगला राज्य कारभार चालवत आहेत, असं शरद पवार म्हणाले. सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे. चार चार वेळा मुख्यमंत्री केलं 82 वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही मी कधीच थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला जे सोडून गेले ते सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असं म्हटलं.

लोकांनी मला एक दिवसही सुट्टी दिली नाही

राज्य चालवायचे असेल राज्याचे भविष्य लोकांचे भविष्य उत्तम व्हायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधिमंडळात लोकांनी मला एकही दिवस सुट्टी दिली नाही. त्या लोकांचे भविष्य चा विचार करायची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही मला काय द्यायचं ठेवलं नाही. 4 वेळ मुख्यमंत्री, 52 वर्षांपासून निवडून देताय, पुढील काळ लोकांच्या जीवन आणि गावं समृद्ध करण्यासाठी देणार आहे, असं शरद पवार म्हणाले. कोणाला सांगताय म्हतारा झालोय जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत थकणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

उस्मानाबाद सारख्या ज्या जिल्ह्याने एवढी वर्ष साथ दिली, ठीक आहे काही लोक गेलेले, जे गेले ते गेले, अस म्हणत पूर्वीचे सहकारी पद्मसिंह पाटील यांची आठवण काढली. मात्र, जी तरुण पिढी आहे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी मी आलोय हे राज्य प्रसिद्ध कशासाठी आहे? शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. कोण कोणत्या जातीचा आहे का? अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले पण छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, असं शरद पवार म्हणाले.

पदावर बसलेले लोक तारतम्य बाळगत नाहीत

कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी सोडून द्या म्हणतो, असं भाष्य शरद पवार यांनी राज्यपालांसदर्भात केलं, आहेय राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श ठेवायचं हे ठररवायला हवं. ज्या छत्रपतींचा उल्लेख आपण केला त्या शिवछत्रपतींचं आयुष्य जिजाऊंनी घडवलं. कृतत्वांचा वसा पुरुषांनी नाही तर स्त्रियांनी जपला. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानगंगा पोहचविण्याचे कार्य केले. क बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे. ज्यांनी भारताला घटना दिली ,स्वतः जाग केलं त्यांच्यापाठी रमाबाई उभ्या राहिल्या त्यामुळे त्यांना ते करता आले, असं शरद पवार म्हणाले.

माझ्या दृष्टीने येथील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. जयंत पाटील यांना आत्ता फोन करून उस्मानाबाद जिल्ह्यातील पाण्याच्या प्रश्नाचं काय झालं असं विचारलं. कोरोना काळात हजारो लोक मृत्युमुखी पडले, संकट ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याच काम टोपेंनी केलं. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रातील लोकांना बाहेर काढलं.

रशिया आणि युक्रेन मधील संघर्ष सुरु आहे. तेथील विद्यार्थ्यांशी माझा संपर्क आहे, जेव्हा डॉक्टर होण्याची वेळ येते तेव्हा लोक युक्रेन सारख्या देशात जातात तेथे आपली हजारो मुलं आहेत. आठ आठ दिवसांपासून ते भुयारात बसलेत, बाहेर पडता येत नाही. केंद्र सरकारने काही पावलं टाकली आहेत तेथे आम्ही सोबत आहोत तेथे आम्ही राजकारण आणणार नाहीत. तेथील मुलांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. ज्या वेळेस युद्ध थांबेल तेव्हा मोठ्या संकटाला आपल्याला तोंड द्यावे लागेल ते म्हणजे महागाई आहे. त्या संकटाला तोंड आपल्याला द्यायच आहे या संकटाला महाराष्ट्र सरकार तोंड देईल ही मला खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले. संकट येईल तेव्हा राजकारण आणायचं नाही, असंही ते म्हणाले.

मी पुन्हा येऊ दिलं नाही

संकट काळात राजकारण आणायचं नसतं. काही लोकांना जमत नाही,ते कुठेही राजकारण करतात. निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण मी येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ही आघाडी यशस्वी झाली आहे. उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करतेय, असं शरद पवार म्हणाले.

इतर बातम्या:

दौरा पंतप्रधान मोदींचा, गुजगोष्टी फडणवीस-अजित दादांच्या अन् चर्चा राजकीय गोडव्याची!

Navi Mumbai | युक्रेनमध्ये अडकलेला नेरूळचा विद्यार्थी मायदेशी पोहोचला सुखरूप

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.