पार्टी फर्स्ट! न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात; 81 वय, सळसळतं राजकारण, वाचा Updates

| Updated on: Nov 05, 2022 | 1:07 PM

पवारांनी डिस्चार्ज घेतल्यानंतर थेट रेसकोर्स मैदान गाठलं. या ठिकाणी त्यांच्या करिता हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आलं होतं. पवार रेसकोर्सवर गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या हाताला बँडेज लागलेलं दिसतं होतं.

पार्टी फर्स्ट! न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात; 81 वय, सळसळतं राजकारण, वाचा Updates
न्यूमोनियाचा आजार, हाताला बँडेज, शरद पवार रुग्णालयातून थेट शिर्डीच्या मेळाव्यात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे आजही देशातील सर्वच तरुण आणि बुजुर्ग राजकारण्यांसाठी आदर्श राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यातून, अफाट बुद्धिमत्ता, अभ्यास आणि लोकसंपर्कातून शरद पवारांनी हे वेळोवेळी सिद्धही केलं आहे. मागच्यावेळी वयाच्या 80व्या वर्षीही शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली अन् साताऱ्यातील लोकसभा निवडणुकीचा (loksabha election) गेम पालटला. पवारांची ही सभा संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली. आताही पवारांच्या कर्तव्य निष्ठतेचं हे रुप पाहायला मिळालं आहे. रुग्णालयात न्यूमोनियावर उपचार घेत असताना त्यांनी मध्येच डिस्चार्ज घेतला असून थेट पक्षाच्या मेळाव्यासाठी शिर्डीत (shirdi) दाखल झाले आहेत. वयाच्या 81व्या वर्षीही आजाराची पर्वा न करता पवारांनी दाखवलेल्या या उत्साहाची एकच चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांना पाच दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवसांसाठी ते रुग्णालयात भरती झाले होते.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे या तीन दिवसातील कार्यक्रम त्यांनी रद्द केले होते. भेटीगाठी टाळल्या होत्या. मात्र, उपचार घेऊन शिर्डीतील पक्षाच्या मंथन मेळाव्याला जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं.

काल राष्ट्रवादीचं शिर्डीत दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू झालं. आज या शिबीराचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. काल पवारांना डिस्चार्ज मिळणं अपेक्षित होतं. डिस्चार्ज मिळाल्यावर ते शिर्डीला जाणार होते. पण डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला नाही.

त्यामुळे पवारांनी रुग्णालयातून आज डिस्चार्ज घेतला. शिर्डीतील शिबीराला संबोधित करण्यासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला. शिबीर आटोपल्यावर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहेत.

पवारांनी डिस्चार्ज घेतल्यानंतर थेट रेसकोर्स मैदान गाठलं. या ठिकाणी त्यांच्या करिता हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आलं होतं. पवार रेसकोर्सवर गाडीतून उतरल्यानंतर त्यांच्या हाताला बँडेज लागलेलं दिसतं होतं. म्हणजे हाताला बँडेज असूनही पवार शिर्डीकडे जायला निघाले. त्यांचा हा उत्साह आणि ऊर्जा तरुणांना लाजवेल अशीच होती.

या शिबिरात ते समारोपाचे भाषण करणार आहेत. त्यामुळे पवार या शिबीरात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या भाषणात पवार केंद्रावर हल्ला करतात की राज्यातील सरकारवर याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.