ब्रेकिंग: युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, ठाकरेगटाला मोठा धक्का

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Nov 19, 2022 | 11:23 AM

नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीच्या बातम्या. गोऱ्हेंच्या निष्ठावंत कार्यकर्तीचा राजीनामा...

ब्रेकिंग: युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, ठाकरेगटाला मोठा धक्का

पुणे : ठाकरेगटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. अशातच आता शिवसेनेची (Shivsena) यंग ब्रिगेडही नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. कारण युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले (Sharmila Yevale) यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे.

यंग ब्रिगेडही नाराज

मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्या नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितलं.

युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावलं आहे. युवती सेनेच्या पदाधिकारी मुंबईत बैठकीला जाणार आहेत. मात्र आम्ही राजीनामा देण्यावर ठाम आहोत, असं शर्मिला म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही पदाधिकारी राजीनामा देणार आहे. शहर, तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या तरूणी नाराज आहेत. तरूणी, महिला यांचा राजकारणातील वावर कमी आहे. सध्या ग्रामीण भागातही तरूणी पुढे येत आहेत. राजकारणात सक्रीय होत आहेत. ही चांगली आहे. पण नेतृत्व करताना स्थानिक पातळीवरील महिला-तरूणींना होणार त्रास लक्षात घेतला पाहिजे.पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत. त्यामुळे युवा नेत्यांमध्ये नाराजी आहे, असं म्हणत शर्मिला यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

शर्मिला येवले या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच शर्मिला यांचा हा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI