Chandrakant Khaire : मेळाव्याच्या गर्दीचं गणित सांगताना चंद्रकांत खैरेंचे आरोप, ‘ते कोटी आणि ते 500 रुपये’

Chandrakant Khaire : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आरोपांची राळ उडवली आहे. त्यांच्या दसरा मेळाव्याला कशामुळे गर्दी जमणार हे खैरेंनी सांगून टाकले आहे..

Chandrakant Khaire : मेळाव्याच्या गर्दीचं गणित सांगताना चंद्रकांत खैरेंचे आरोप, 'ते कोटी आणि ते 500 रुपये'
खोक्यानंतर आता 500 च्या नोटा Image Credit source: TV9marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 8:11 PM

दत्ता कानवटे TV9 मराठी, औरंगाबाद :  दसरा मेळावा (Dashara Melava) जवळ येत आहे, तसे राज्यातील राजकारण तापत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे  (Chandrakant Khaire)  यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात आरोपांची राळच उठवली आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्याला कशामुळे गर्दी जमणार याचं गणितच खैरेंनी उघड केले..

खैरे यांनी शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी राज्यात पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप केला. खैरेंचा रोख अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होता. मुख्यमंत्र्यांनी बीकेसीत गर्दी करण्यासाठी पैशे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याचा दावा खैरैंनी केला.

खैरे केवळ आरोप करुनच थांबले नाही तर त्यांनी या सभेसाठी प्रत्येक जिल्ह्याला किती रुपये वाटप करण्यात येतील, याचाही आकडा हातसरशी सांगून टाकला. हा आपला अंदाज नाही तर, त्यांनी ही रक्कम शिंदे यांनी दिली असेलच असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याला या सभेसाठी एक कोटी रुपये दिल्याचा गंभीर आरोप खैरे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

एवढेच नाही तर या सभेसाठी माणसांची गर्दी जमवण्यात येणार आहे. बीकेसीवरील दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक माणसाला ट्रॅव्हल्स, एसटी, रेल्वेने तर आणण्यात येणार आहेच. पण त्यांना खर्चासाठी प्रत्येकी 500 रुपये देण्यात येणार असल्याचा आरोप ही खैरे यांनी केला. शिंदे पैसे देऊनच या मेळाव्याला गर्दी जमावणार असल्याचा आरोप त्यांनी केला.

औरंगाबादने शिंदे गटाला सर्वात मोठा पाठिंबा दिला आहे. पाच आमदार शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यानंतर शिंदे गटावर खैरे तोंडसूख घेण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे खैरै यांनी केलेल्या या आरोपाला आता शिंदे गटातून काय प्रत्युत्तर मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.