दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने आता डायरेक्ट उद्धव ठाकरेंचाच आवाज वापरला; नवी खेळी

शिंदे गटाने दसरा या आधी बाळासाहेबांचा आवाज वापरला. यानंर शिंदे गटाने आता डायरेक्ट उद्धव ठाकरेंचाच आवाज वापरला आहे.

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाने आता डायरेक्ट उद्धव ठाकरेंचाच आवाज वापरला; नवी खेळी
वनिता कांबळे

|

Oct 01, 2022 | 4:54 PM

मुंबई : दसऱ्या आधीच मुंबईत राजकीय धुराळा उडाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात दसरा मेळाव्याला(Shivsena Dasara Melava 2022) गर्दी जमवण्यावरुन चढाओढ लागली आहे. शिंदे गटाने दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी आधी बाळासाहेबांचा आवाज वापरला. यानंर शिंदे गटाने आता डायरेक्ट उद्धव ठाकरेंचाच आवाज वापरला आहे.

शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लाँच केला आहे. टीझरमध्ये शिंदे गटाने आपल्या पहिल्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटा आणि त्यांचाच आवाज वापरला. यानंचर आता दुसऱ्या टीझरमध्ये उद्धव ठाकरेचा आवाज वापरत शिंदे गटाने नवी खेळी केली आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून नवा टिझर जारी करण्यात आलाय. या टीझरमध्ये उद्धव ठाकरेंना जुन्या भाषणाची आठवण करून देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणांचे छोटे-छोटे क्लिप या टीझरमध्ये वापरण्यात आले आहेत. या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत आहे.

या क्लिपमधील उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शरद पवार, सोनिया गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही असा टोला शिंदे गटाने ठाकरेंना या टीझरमधून लगावला आहे.

विसर ना व्हावा अशी टॅग लाईन… निष्ठा विचारांशी लाचारांशी नाही… अशी या टीझरची कॅच लाईन आहे.

या पूर्वी पहिल्या टीझरमध्ये शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटा आणि त्यांचाच आवाज वापरलाय. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असे म्हणत या टीझरच्या माध्यमातून शिवसैनिकांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’ आणि ‘बाळासाहेब तुमचा वाघ, म्हणून हिंदूत्वाला जाग’ अशा प्रकारचे दोन पोस्टर देखील शिंदे गटाकडून मुंबईत लावण्यात आले आहेत. हे पोस्टर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत.

यानंतर आता शिंदे गटाने जाहीर केलेले दोन पोस्टर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी सुरु आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें