शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद

सुनील काळे

| Edited By: |

Updated on: Jun 24, 2021 | 6:58 AM

शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद
राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे

मुंबई : शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आल आहे. (Shirdi Sai Sansthan Trust Chairman NCP MLA Ashutosh Kale)

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

कोण आहेत आशुतोष काळे?

35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

विश्वस्त मंडळावर कोणाची वर्णी?

अध्यक्षपद : आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी)

उपाध्यक्ष : माजी आमदार रवींद्र मिर्लेकर (शिवसेना)

राष्ट्रवादी काँग्रेस

आशुतोष काळे (अध्यक्ष) जयंत जाधव महेंद्र शेळके सुरेश वाबळे संदीप वर्पे अनुराधा आदिक

काँग्रेस

डॉ एकनाथ गोंदकर डी पी सावंत सचिन गुजर राजेंद्र भोतमागे नामदेव गुंजाळ संग्राम देशमुख

शिवसेना

रवींद्र मिर्लेकर (उपाध्यक्ष) राहुल कनाल खा. सदाशिव लोखंडे रावसाहेब खेवरे

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशिवाय 15 सदस्य असतात. 2004 पासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंडळाची मुदत तीन वर्षांसाठी असते.

शिर्डी साई संस्थान आणि वाद 

साईबाबांचे भाविक देशा-विदेशात पोहचले असताना भारतीय पोषाखातच साईमंदिरात यावे अशा फलकानं उपस्थित झालेला वाद, 25 हजार भरा आणि काकड आरती करा, दर्शनावरून शिर्डी ग्रामस्थ आणि बगाटे यांच्यात झालेला वाद अशा अनेक प्रसंगी शिर्डी संस्थान वादात सापडलंय. अशातच भाविकांप्रमाणेच पत्रकार कोरोना नियमांचं अवलंब करत वृतांकन करत असताना समितीने आगळीक केली होती.

पत्रकारांसाठी या समितीने जाचक नियमावली करण्याचा घाट घातला होता. उच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या समितीने पत्रकारांसाठी 11 कलमी नियमावली तयार केली. महत्वाचं म्हणजे त्याचा ठराव करत उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

सिद्धिविनायकचं अध्यक्षपद शिवसेनेकडे, आता शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीत रस्सीखेच

विखे विरुद्ध थोरात पुन्हा सामना रंगणार, संगमनेरच्या 14 ग्रामपंचायतींमध्ये थेट लढत

(Shirdi Sai Sansthan Trust Chairman NCP MLA Ashutosh Kale)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI