शिरुर, खेड-आळंदी, आंबेगाव,जुन्नर, भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा

गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर पुणे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने तीन जागा तर केवळ एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने जिंकली होती.

शिरुर, खेड-आळंदी, आंबेगाव,जुन्नर, भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा
सचिन पाटील

|

Sep 10, 2019 | 6:06 PM

पुणे : गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर पुणे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने तीन जागा तर केवळ एक जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने जिंकली होती. यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघांमधील अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपशी संलग्न होऊन सरकारला पाठिंबा दिला होता. तर उर्वरित एक जागा जुन्नर विधानसभा मतदारसंघातील जागा मनसेने जिंकली होती. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील एकमेव मनसे आमदार असलेले शरद सोनवणे ही शिवसेनेत गेले.

अशा नेक घडामोडी या शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाल्या आहेत. गेल्या चार साडे–चार वर्षांमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडत आहे. त्यात लोकसभा निवडणुकीतील जातीपातीच्या राजकारणाची भर पडली आहे.शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हेंनी पराभव केला आहे. मात्र हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचा नसून छत्रपती संभाजी महाराजांचा असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरुर,भोसरी या विधानसभा मतदारसंघात अधिक रंगत येणार आहे.

या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हेंच्या खांद्यावर राज्याच्या नेतृत्वाची धुरा असल्याने राजकीय कसरत पहायला मिळणार आहे. तर लोकसभेला पराभव झालेल्या आढळरावांनी युतीचे सर्व आमदार निवडून आणण्याची तयारी सुरु केली आहे. जुन्नर,खेड हे दोन मतदारसंघ शिवसेनेकडे, शिरुर भाजपकडे तर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. मात्र गेल्या चार वर्षात खेड मतदारसंघावर भाजपाची एक स्वतंत्र पकड वाढली आहे.

भोसरी,खेड-आळंदी, भोसरी,आंबेगाव, जुन्नर या विधानसभा मतदार संघामधून जाणारा पुणे नाशिक महामार्ग कायम वाहतुकीच्या कोंडीमुळे सापडलेला असतो हा एक मोठा प्रश्न या विधानसभा  मतदारसंघांमध्ये कायम गाजत आलेला आहे. तर शिरूर विधानसभा मतदारसंघांमधील ही पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची झालेले आहे. त्यामुळे हा मुद्दादेखील येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये गाजू शकतो.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यत बंदीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात गाजलेला समोर आला आहे. शिरूर,चाकण या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचे प्रश्न असतील किंवा कंपनी चालकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतील.

   1) खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र या मतदारसंघात बदलाचे वारे आले आणि मोठा विरोधाचा डोंगर राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा राहिला आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार सुरेश गोंरेना निवडून दिले. खेड तालुक्‍यात शिवसेनेचा पहिल्यांदा आमदार होण्याचा मान आमदार सुरेश गोरे यांना मिळला. मात्र यातून संपूर्ण तालुक्यात राजकीय समीकरणे बदलत गेली.

केंद्रात आणि राज्यात भाजप सेना सत्तेत आल्यानंतर या मतदारसंघात भाजपाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची बांधणी भाजपाने केली आणि दोन नगरपरिषद, दोन जिल्हा परिषद गटात एक स्वतंत्र स्थान निर्माण केली केले. तर पुढील काळात माजी पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात भरघोस विकास कामे भाजपाने राबविली. त्यात शिवसेनेचे आमदार गोरे कमी पडताना दिसत होते त्यातच मराठा आंदोलनाची ठिनगी पडली ओबीसी नेतृत्वातुन आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील मराठा आंदोलन झालेल्या हिंसक आंदोलनाचे सूत्रधार करत कारवाईला सुरु झाली.

लोकसभेनंतर पुन्हा एकदा या मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार मोहिते मात्र पराभवाचा वचपा काढण्यासाठी रिंगणात उतरणार आहेत. मोहिते यांना यश आपल्या पदरात पडेल अशी खात्री आहे. पण राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला नक्की मिळते यावर लढतीचे चित्र ठरणार आहे.

जातीपातीच्या राजकारणाचा फटका लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या या चढाओढीत याचा फायदा भाजपाला होण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. या मतदारसंघात उभी राहिलेली उद्योगनगरी आणइ वाढतं शहरीकरण यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक समस्या आहेत.

या समस्या शिवसेना सोडविण्यात कमी पडले आहेत. त्यामुळे या मतदार संघातून भाजपाच्या माध्यमातून तरुण नेतृत्व उभं राहिल्याने आता या मतदार संघातून भाजपा लढणार की शिवसेना यामध्ये संभ्रम आहे. तरीही या मतदार संघातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

 2014 चा निकाल

 • सुरेश गोरे विजयी (शिवसेना)
 • प्रमुख विरोधक-दिलीप मोहिते (राष्ट्रवादी काँग्रेस)
 • विधानसभा2014 निवडणूक आकडेवारी
 • शिवसेना-103207 विजयी उमेदवार
 • राष्ट्रवादी काँग्रेस-70489
 • भाजप-16554
 • मनसे-1974
 • काँग्रेस-1765

संभाव्य उमेदवार

 • अतुल देशमुख- भाजप
 • सुरेश गोरे- शिवसेना
 • दिलीप मोहिते- राष्ट्रवादी

2) शिरुर विधानसभा मतदारसंघ

शिरुर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ खेड आळंदी प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याही मतदारसंघात भाजपाचे आमदार बाबुराव पाचार्णे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव करत संपूर्ण तालुका भाजपमय केला.

विकासकामांच्या जोरावर आमदार पाचार्णे यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. मात्र शिरुर तालुक्यात अनेक समस्या आजही जशास तसा असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत अनेक आंदोलने उभी राहिली आहेत. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना या मतदार संघातून चांगलं मताधिक्य देण्यात आल्याने, या मतदारसंघात युतीची ताकद कमी झाल्याचं चित्र दिसत आहे.

शिरुर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये युती आणि आघाडी अशी लढत होऊन अपक्ष उमेदवार ही रंगणात रहाणार आहे.

 2014 चा निकाल

 • बाबुराव पाचर्णे विजयी – (भाजप)
 • प्रमुख विरोधक-मंगलदास बांदल
 • अशोक पवार(राष्ट्रवादी काँग्रेस)

विधानसभा 2014 निवडणूक आकडेवारी

 • *भाजप-92579,विजयी उमेदवार
 • *राष्ट्रवादी काँग्रेस-81638
 • *शिवसेना-17187
 • *मनसे-13621
 • *काँग्रेस-4246 संभाव्य उमेदवार…
 • बाबुराव पाचार्णे- भाजप
 • अशोक पवार- राष्ट्रवादी काँग्रेस
 • मंगलदास बांदल- राष्ट्रवादी काँग्रेस

3) आंबेगाव विधानसभा मतदारसंघ

 संपूर्ण जिल्ह्याचं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले असते. याचं कारण या मतदारसंघात सलग सहा वेळेस आमदार राहिलेले दिलीप वळसे-पाटील आता सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघात पराभव झालेले नाही. वळसे पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचे हे होम पिच आहे. दोघेही एकाच तालुक्यातील आहेत. तर या मतदारसंघावर वळसे पाटील यांचे वर्चस्व आहे.

हे दोन्ही नेते आंबेगाव तालुक्यातील असल्याने लोकसभेत शिवाजी आढळराव पाटील तर विधानसभेत दिलीप वळसे पाटील असं साटंलोटं असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होती. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान हे चित्र पालटून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे हे निवडून आले आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर बसलेला शिक्का पुसला गेला.

लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटलांच्या पराभवाला या मतदारसंघाचा मोठा वाटा राहिला आहे. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वतः शिवाजी आढळराव हे वळसे-पाटलांसोबत दोन हात करण्याची शक्यता आहे. तसं झालंच नाही तर मुलगा अक्षय आढळराव पहिल्यांदा नशीब अजमावू शकतात.

आढळराव पाटलांचे पुत्र अक्षय आढळराव आता या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांमध्ये स्थान निर्माण करत आहे. त्यामुळे आंबेगाव मतदार संघातून ही लढत आढळराव पाटील विरुद्ध वळसे पाटील अशीच होणार हे मात्र नक्की.

2014 चा निकाल

 • दिपीप वळसे पाटील- विजयी,राष्ट्रवादी काँग्रेस
 • अक्षय आढळराव पाटील (शिवसेना)विधानसभा 2014 निवडणूक आकडेवारी
 • राष्ट्रवादी काँग्रेस-120235
 • शिवसेना-62081
 • भाजप-4615

सभाव्य उमेदवार

 • दिलीप वळसेपाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
 • अक्षय आढळराव पाटील – शिवसेना

4)जुन्नर विधानसभा मतदारसंघ

जुन्नर तालुक्याला निसर्गाचं एक वेगळं वरदान आहे. वातावरणातील बदल घडतात त्याच पद्धतीने याही मतदारसंघात राजकीय बदल घडनाना पाहायला मिळाले. जुन्नर तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला म्हणून वल्लभ बेनकेंचे वर्चस्व होतं. तर शिवसेना विरोधक म्हणून आपली भूमिका करत होती. मात्र या मतदारसंघात मनसेनेच बाजी मारत आमदार शरद सोनवनेच्या रुपातून राज ठाकरेंना महाराष्ट्रातून एकमेव आमदार दिला.

मात्र हा आमदार मनसेच्या छायेखाली कधीच दिसला नाही. शेवटी लोकसभेच्या तोंडावर आमदार सोनवनेंनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मात्र लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य वाढल्याचे चित्र पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हेंना निवडून देण्यात जुन्नर तालुक्याचा मोलाचा वाटा राहिला.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठी राजकीय बदल शिवसेनेने सुरु करत महिलांचे मोठं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघातून शिवसेनेकडून आमदार सोनवने एकमेव इच्छुक उरले आहेत. मात्र या तालुक्यातून तरुणांचं एक वेगळं नेतृत्व म्हणून सत्यशील शेरकर यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून अतुल बेनके यांच्या खांद्यावर धुरा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघातून चौरंगी लढत होण्याची चिन्हं राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.

 2014 मध्ये निवडून आलेले आमदार

 • शरद सोनवणे, आधीचा पक्ष मनसेचे आताचा पक्ष शिवसेना
 • प्रमुख विरोधक-आशा बुचके,अद्याप अपक्ष

विधानसभा 2014 निवडणूक आकडेवारी

मनसे-60,073 विजयी उमेदवार शिवसेना-43,226 राष्ट्रवादी काँग्रेस-40,311 भाजप-22,369 बहुजन समाज पार्टी-8,587

संभाव्य उमेदवार.. अतुल बेनके- राष्ट्रवादी काँग्रेस शरद सोनवणे- शिवसेना सत्यशील शेरकर – राष्ट्रवादी काँग्रेस आशा बुचके

5)भोसरी विधानसभा मतदारसंघ

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक विधानसभा मतदारसंघ. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरी भागामधला एक विधानसभा मतदारसंघ पिंपरी-चिंचवडमधील हा सर्वाधिक लक्षवेधी ठरणारा मतदारसंघ आहे. महेश लांडगे यांच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड आहे. पण भाजपचे निष्ठावान पक्षनेते एकनाथ पवार यांचे वरिष्ठ नेत्यांशी असलेले घनिष्ठ संबंध महेश लांडगे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एकनाथ पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या रूपाने निवडणूक लढवली होती. त्यामुळे ते वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध वापरून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.

तर दुसरीकडे हा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे वलय आणि लोकप्रियता हे दोन्हीही मतदारसंघांमध्ये वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला ही चांगलीच मदत होण्याची शक्यता आहे. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची अधिक शक्यता आहे. पण युती झालीच नाही तर सेनेकडून पुन्हा सुलभा उबाळे किंवा राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन विकास आघाडीनेही ही या मतदारसंघात लक्षणीय मते घेतली असल्यामुळे, त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे.

दरम्यान महेश लांडगे यांची लोकप्रियता असली तरी मतदारसंघातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न असेल किंवा रेड झोनमध्ये येणाऱ्या अनधिकृत घरांचा प्रश्न त्याचबरोबर सरसकट शास्ती कर माफ करण्याचा मुद्दा महेश लांडगे यांच्यासाठी मोठा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

2014 चा निकाल

 • महेश लांडगे, विजयी- अपक्ष भाजप संलग्न
 • प्रमुख विरोधक-सुलभा उबाळे(शिवसेना)
 • विलास लांडे(राष्ट्रवादी काँग्रेस)

विधानसभा 2014 निवडणूक आकडेवारी

 • *अपक्ष-60173 विजयी उमेदवार
 • *शिवसेना-44857
 • *राष्ट्रवादी काँग्रेस-44211
 • *भाजप-43626
 • *काँग्रेस -14363

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें