भारत-पाक फाळणीपेक्षा सेना-भाजप जागावाटपाचा प्रश्न भयंकर : संजय राऊत

युतीसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut India-Pakistan partition) यांनी, शिवसेना-भाजपमधील जागावाटप हे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा कठीण आहे, असं म्हटलं.

भारत-पाक फाळणीपेक्षा सेना-भाजप जागावाटपाचा प्रश्न भयंकर : संजय राऊत

मुंबई : युतीसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut India-Pakistan partition) यांनी, शिवसेना-भाजपमधील जागावाटप हे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा कठीण आहे, असं म्हटलं. दोन्ही पक्ष (Sanjay Raut India-Pakistan partition) जास्तीत जास्त जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच युतीची घोषणा होऊनही जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप जाहीर झालेला नाही.

परिणामी दोन्ही पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांनी जागावाटपाचा प्रश्न हा भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा कठीण आहे, असं नमूद केलं. संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात थोड्या थोडक्या नव्हे तर 288 जागा आहेत. त्यामुळे या जागांचं वाटप भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षा भयंकर आहे”.

न्यूजरुम स्ट्राईकमध्ये रोखठोक संजय राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईकमध्ये युतीबाबतच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. “युतीच्या घोषणेची दिरंगाई होऊ नये या मताचा मी आहे. अनेक ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते खोळंबले आहेत. 288 जागांचा विषय आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. युतीसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत”, असं शिवसेनेचे महत्त्वाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut TV9) यांनी सांगितलं. ते टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक (Sanjay Raut TV9) या कार्यक्रमात बोलत होते.

सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं

“आमच्या पक्षातील लोकांना कदाचित वाटत असेल सत्तेत जायला हवं, पण माझं व्यक्तीगत मत म्हणाल तर त्यावेळी 2014 मध्ये आम्ही सत्तेत गेलो नसतो, तर आजचं चित्र उलटं असतं. विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याचे फायदे अनेक असतात. 5 वर्ष संघर्ष करुन आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो असतो, तर नक्कीच त्याचा फायदा शिवसेनेला झाला असता. लोक मतदान करताना प्रबळ विरोधी पक्ष जो असतो, लढणार पक्ष जो असतो, त्याला पर्याय म्हणून स्वीकारतात हा माझा अनुभव आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या 

युतीसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे : संजय राऊत 

VIDEO : ‘न्यूजरुम स्ट्राईक’ विथ संजय राऊत

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *