AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं, यंदाचा मेळावा शिवाजी पार्कवर नाही!

शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच आहे, त्यात काही शंका नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के (Shiv Sena Dussehra Melava 2021) होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलं, यंदाचा मेळावा शिवाजी पार्कवर नाही!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 10:24 AM
Share

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच आहे, त्यात काही शंका नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के (Shiv Sena Dussehra Melava 2021) होणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सांगितलं. शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील दादर इथल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होत असतो. मात्र कोरोना संकटामुळे यंदा हा मेळावा शिवाजी पार्कऐवजी माटुंगा इथल्या षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेचा दसरा मेळावा 100 टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील”.

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाई नाही

“यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे” असं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

गतवर्षीचा ऑनलाईन मेळावा, उद्धव ठाकरेंचं गाजलेलं भाषण

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सेनेचा पहिलाच दसरा मेळावा गतवर्षी पार पडला. परंतु या मेळाव्यावर कोरोनाचं सावट होतं. याचमुळे शिवतीर्थावरची भव्य सभा टाळून सेनेचे मोजके नेते, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईन देखील दाखविण्यात आला होता. याच मेळाव्यात मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला सारुन उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपवर आसूड ओढले होते.

महाराष्ट्र बंदमध्ये तिन्ही पक्ष ताकदीने सहभागी

महाराष्ट्राच्या बंदकडे देशाचं लक्ष, बंदला पाठिंबा नाही असं कोणी राजकीय विधानं कोणी करत असेल तर त्यांनी आपण देशाचे नागरिक आहोत का, शेतकऱ्यांचे देणं लागतो का हा प्रश्न स्वत:ला विचारावा, बंद मोडून काढू, रस्त्यावर येऊन दाखवा असं आव्हान कोणी देऊ नये. मंत्रीपुत्राने शेतकऱ्यांना चिरडलं, थार जीपगाडीने चिरडलं, अशी कोणती गाडी मुंबईत, महाराष्ट्रात असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, बंद चांगला आहे, तिन्ही पक्ष ताकदीने बंदमध्ये सहभागी झाले आहेत. किरकोळ घटना घडतात, त्या जगभरात बंदमध्ये होत असतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

विरोधाचे किडे वळवळत असतात, हा शेतकऱ्यांसाठी बंद आहे, शेतकऱ्याने पिकवलं नाही तर जे बस गाड्या काढा म्हणत आहेत ते उपाशी मरतील, शेतकऱ्यांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

संबंधित बातम्या 

शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही, उद्धव ठाकरेंचं ‘नियोजन’ संजय राऊतांनी सांगितलं!

झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? आघाडी की स्वबळ? राऊतांचं थेट उत्तर

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.