झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? आघाडी की स्वबळ? राऊतांचं थेट उत्तर

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला झटका बसला. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. या निकालानंतर शिवसेना पालिका निवडणुकीला कशी सामोरे जाणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. (shiv sena will contest elections in alone, says sanjay raut)

झेडपीला शिवसेनेला झटका, मग मुंबई पालिका कशी लढणार? आघाडी की स्वबळ? राऊतांचं थेट उत्तर
sanjay raut
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 12:07 PM

मुंबई: नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला झटका बसला. त्यामुळे शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे. या निकालानंतर शिवसेना पालिका निवडणुकीला कशी सामोरे जाणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. त्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं आहे. मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल. पाच वर्षांपूर्वी निवडणूक ही आमच्या ताकदीवर आम्ही लढलो, असं राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महापालिका निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

आमचं राज्य नसेल तर कुणाचं राज्य असेल?

मुंबईही शिवसेनेचं जन्मस्थान आहे. त्या महापालिकेवर शिवसेनेचं राज्य नसेल तर कुणाचं राज्य असेल? आमचंच राज्य असेल, असा दावाही त्यांनी केला.

दसरा मेळावा होणारच

दरम्यान, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने दसरा मेळावा होईल हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. फटाके वगैरे फोडून जल्लोषात हा मेळावा होईल, असं त्यांनी सांगितलं. आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहेत. नियम पाळून सण साजरे होत आहेत. दसरा मेळावाही होईल. पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

षण्मुखानंदमध्ये दसरा मेळावा?

दरम्यान, दादरच्या शिवाजी पार्क ऐवजी माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या मेळाव्यासाठी प्रवेश मर्यादित ठेवण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

सोशल मीडियाचा वापर द्वेषासाठी

यावेळी त्यांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. संपूर्ण सोशल मीडियाचा वापर द्वेषाचं आणि सूडाचं राजकारण करण्यासाठी केला जात आहे. आपल्या राजकीय विरोधकांची बदनामी करण्यासाठी हा वापर केला जात आहे. जर कोणी आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला असेल तर त्याचं समर्थन व्हायला हवं, असं ते म्हणाले.

पवारांच्या निकटवर्तीयांच्या घर-ऑफिसवर छापे

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या नंदूरबारमधील साखर कारखान्यावर धाड मारण्यात आली आहे. आयकर विभागाने काल 12 तास या कारखान्यात झाडाझडती घेतली. त्यानंतर आज सकाळीही छापेमारी सुरू केली आहे. साखर कारखान्याच्याबाहेर मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

पार्थ पवार यांचे निकटवर्तीय सचिन शृंगारे यांचा नंदूरबारच्या समशेरपूर येथे आयान मल्टिट्रेट प्रायव्हेट लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यावर काल आयकर विभागाने छापा मारला होता. आयकर विभागाचे पाच ते सहा अधिकारी ही तपासणी करत होते. मात्र आयकर विभागाच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. काल 12 तासाच्या तपासणीनंतर आज सकाळी पुन्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवात केली आहे. आयकर विभागाच्या वतीने या प्रकरणात अजून कुठलीही प्रतिक्रिया आली नाहीये. आयकर विभागाच्या हाती काय लागते तपासणी संपल्यावर समोर येणार आहे.

संबंधित बातम्या:

अजित पवार आणि निकटवर्तीयांवर छापेमारी, संजय राऊत म्हणतात, अपना भी टाईम आयेगा !

परमबीर सिंग आणि वाझेही जनतेचे सेवकच होते; एनसीबीच्या समीर वानखेडेंवर नवाब मलिक यांचा पलटवार

पार्थ पवार यांच्या निकटवर्तीयाच्या साखर कारखान्यावर 12 तास छापेमारी, सकाळी पुन्हा झडाझडती; नंदूरबारमध्ये उलटसुलट चर्चा

(shiv sena will contest elections in alone, says sanjay raut)

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.