AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रश्मी बागल यांच्या तिकिटाचा निर्णय झाला, नारायण पाटील यांचा पत्ता कट

शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल (Rashmi Bagal Karmala) यांना उमेदवारी जाहीर केली.

अखेर रश्मी बागल यांच्या तिकिटाचा निर्णय झाला, नारायण पाटील यांचा पत्ता कट
| Updated on: Oct 02, 2019 | 12:41 PM
Share

सोलापूर : शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल (Rashmi Bagal Karmala) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांचा पत्ता कट झाला आहे. तर रश्मी बागल (Rashmi Bagal Karmala) यांच्या पदरात उमेदवारी पडली आहे.

राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. दोन दिवसापूर्वी ‘मातोश्री’वर आलेल्या रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) सकाळपासून मातोश्रीवर होत्या. त्या रात्री रिकाम्या हाताने परतल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) यांनी दिलं होतं. विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांनी ‘मातोश्री’वर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता.

रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पण स्थानिक शिवसेना आमदाराची यामुळे नाराजी ओढावली आहे. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील म्हणाले होते. शिवाय त्यांनी त्यांची भूमिका पक्षासमोरही मांडली होती.

तिकिटाबाबत मी आशावादी नाही, तर मला खात्री आहे की उद्धव साहेब मला उमेदवारी देतील. मला शिवसैनिकांचा विरोध नाही, उलट मी प्रवेश केला तेव्हा करमाळ्यात शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं होतं, अशी प्रतिक्रिया रश्मी बागल यांनी दिली होती.

कोण आहेत रश्मी बागल?

  • दिगंबरराव बागल यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या जागी रश्मी बागल यांच्या मातोश्री श्यामल बागल यांना राष्ट्रवादीने 2009 मध्ये आमदार केलं.
  • दिगंबरराव बागल यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळातही काम केलं होतं.
  • करमाळा विधानसभेला 2009 मध्ये माढा तालुक्यातील 36 गावे जोडली आणि या गावांनी उत्तम साथ दिली.
  • राष्ट्रवादीने 2014 च्या निवडणुकीत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. पण अवघ्या 253 मतांनी त्यांचा पराभव झाला.
  • सोलापूर जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली.
  • सध्या रश्मी बागल यांच्याकडे मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाने आणि करमाळा कृषी ऊत्पन्न बाजार समिती आहे. दिंगबरराव बागल यांची राजकीय वारस म्हणून त्या राजकारणात वावरत आहेत. रश्मी बागल या करमाळामधील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
  • आदिनाथ आणि मकाई या साखर कारखान्यांवर त्यांची सत्ता आहे.

रश्मी दिगंबर बागल जन्म – दिनांक 31 मे 1985

  •  शिक्षण – बीए
  • पक्ष – शिवसेना
  • यापूर्वीचा पक्ष राष्ट्रवादी
  • गौरव विजयराव कोलते पती
  • वडील दिगंबरराव बागल माजी सहकार राज्यमंत्री
  • आई श्रीमती श्यामला दिगंबर बागल माजी आमदार
  • बंधू दिग्विजय दिगंबर बागल चेअरमन मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी
  • भूषवलेली पदे – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालिका.
  •  सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालिका, चेअरमन सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण प्रसारक मंडळ

कोण आहेत रश्मी बागल?

संबंधित बातम्या : 

सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त होण्याच्या मार्गावर   

तिकीट कापल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, विद्यमान आमदाराचा इशारा  

शरद पवारांनी लग्न लावून दिलेली तरुणी राष्ट्रवादी सोडणार  

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.