शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले : नाना पटोले

शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते किंवा गुरु होऊ शकत नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शिवसेनेचे नेते अनंत गीते बरोबर बोलले : नाना पटोले
Anant Geete

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते किंवा गुरु होऊ शकत नाहीत असं वक्तव्य केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनंत गीते यांचं महाविकास आघाडीबाबतचं वक्तव्य योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

नाना पटोले म्हणाले, “शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या खंजीर खुपसला आणि शरद पवारांच्या वक्तव्यावर आमतं कोणतंही स्टेटमेंट असणार नाही. केवळ आम्ही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकत्र होतो हे त्यांचं वक्तव्य बरोबर आहे. शिवसेना- काँग्रेस युती होऊ शकत नाही असं म्हटलं जात होतं. महाविकास आघाडी ही त्यावेळची राजकीय परिस्थितीनुसार तयार झाली. त्यामुळे अनंत गीतेंच्या या वक्तव्याचं आम्ही समर्थन करतो. हे बरोबरच आहे. अनंत गीते काय चुकीचं बोलले नाहीत”

मुख्यमंत्र्यांच्या पत्राचं समर्थन

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची सूचना केली. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्र लिहून उत्तर दिलं. त्याबाबत नाना पटोले म्हणाले, “मुद्दा महिलांच्या सुरक्षेचा आहे, मग तो देशाचा असो अथवा राज्याचा. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या संसदेचं अधिवेशन आधी बोलवण्याबाबतच्या विधानाचे समर्थन करतो. अधिवेशन होईल तो नंतरचा भाग आहे – त्यामुळे कायदा व्हावा हे महत्त्वाचं आहे. अधिवेशन घेणं हे महत्वाचे नाही” असं नाना पटोले यांनी नमूद केलं.

राज्यपालांचा एक अधिकाराचा भाग आहे. राज्यपाल यांनी शासनाच्या कामात रोज हस्तक्षेप करावा ही एक नवीन परंपरा आपल्याला पाहायला मिळते आहे. शासन म्हणून पूर्ण जबाबदारी आपण घेतो आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.

अनंत गीते नेमकं काय म्हणाले?

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

संबंधित बातम्या :  

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म, उद्धव ठाकरेंचा बिनीचा शिलेदार आक्रमक

त्यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित, मी पहिल्यापासून सांगतोय, फडणवीसांची गीतेंच्या विधानाला हवा     

अनंत गीते म्हणाले, पवार आमचे गुरू होऊ शकत नाही; तटकरे म्हणतात, तेव्हा गीते शरद पवारांच्या पाया पडले होते!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI