AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer 2: आनंद दिघे यांना मारले गेले…शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा

Dharmaveer 2: आनंद दिघे यांना मारले गेले हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ते चांगले ठणठणीत होते. त्यांना दुपारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती. परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बोलता चालता त्यांचा मृत्यू झाला आहे.

Dharmaveer 2: आनंद दिघे यांना मारले गेले...शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा
Dharmaveer 2
| Updated on: Sep 28, 2024 | 3:32 PM
Share

आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद वाक्य घेऊन ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या रुग्णालयामधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे दाखविले आहे. ही घटना खरंच घडली होती का? त्यावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उत्तर दिले.

काय म्हणाले संजय शिरसाट

आनंद दिघे यांना मारले गेले हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. ते चांगले ठणठणीत होते. त्यांना दुपारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार होती. परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. बोलता चालता त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या सर्व गोष्टी काही काळाने पुढे येतील. त्या वेळी लोक संतापले होते. त्या हॉस्पिटला आग लावली असती. हजारो रुग्ण त्या ठिकाणी होते. त्या सर्वांना शांत करण्याचे काम शिवसैनिकांनी केले. त्यात आग्रभागी एकनाथ शिंदे होते. चित्रपटात दाखवले ते सत्य आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट म्हणाले, चित्रपट पाहताना घटनाक्रम पाहायला हवे. काही लोकांना असे वाटते की शिवसेना त्यांच्यापासून जन्मली आहे. परंतु शिवसेना बाळासाहेबांनी बनवली आहे. दिघे साहेब यांनी जे घडवले त्यावर पाणी फिरण्याचे काम करतात. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांच्या स्वप्नात आल्याचे दाखवले तर त्याला वेगळा संदर्भ लावू नका.

केदार दिघे यांचे आव्हान

आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी संजय शिरसाट यांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, त्यावेळी तुम्ही तोंड बंद करुन का बसला होता. आता इतक्या वर्षांनी हा विषय आणला. मग षडयंत्रात तुम्ही होता का? पुरावे असतील तर सांगा, मग मी आनंद दिघे यांचा पुतण्या कोर्टाची पायरी चढायला तयार आहे. मी सर्व राजकारण सोडून देईल, असे ते म्हणाले.

अंबादास दानवे यांचे आव्हान

दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दल आतापर्यंत सर्व समोर आले आहे. तरीही चौकशी करायची असेल तर करू शकता, सत्ता तुमचीच आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. त्याचबरोबर आमचे सर्व उमेदवार तयार असून येत्या काळात राज्यभरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आमच्याकडे येणार असल्याचा दावा देखील दानवे यांनी केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.