AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Raut : ‘जास्त फंड मिळाला, कुणामुळे? महाविकास आघाडीमुळे’ सुनील राऊतांनी बंडखोरांना सुनावलं

शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे' असं सुनील राऊत यांनी म्हटलंय.

Sunil Raut : 'जास्त फंड मिळाला, कुणामुळे? महाविकास आघाडीमुळे' सुनील राऊतांनी बंडखोरांना सुनावलं
काय म्हणाले सुनील राऊत?Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 27, 2022 | 10:46 AM
Share

मुंबई : सिवेसना खासदार संजय राऊत (Sanjay Raut News)  यांचा सख्खा भाऊ आणि शिवसेना आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यावरुनही चर्चांना उधाण आलं होतं. सुनील राऊतही गुवाहाटीमध्ये बंडखोर शिवसेना (Shiv sena Rebel MLA) आमदारांच्या गटात सामील होतील, अशी चर्चा होती. या सगळ्या चर्चांवर स्वतः सुनील राऊत यांनी पूर्णविराम लावलंय. आपण शिवसेनेसोबत आहोत, असं विधान त्यांनी केलंय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ‘बाळासाहेब आणि उद्धव आमचे कुटुंबीय आहेत. जे काही राहिले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढवली. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरेंवर आहे. अडीच वर्षापूर्वीचे त्यांचे रिकॉर्ड बघा. माझ्या दोन्ही मतदार संघात मी फंड खर्च करतोय. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगला फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे’ असं सुनील राऊत यांनी म्हटलंय.

समर्थनात बॅनरबाजी

आमदार सुनील राऊत यांच्याकडून शिवसेनेच्या समर्थनात असल्याचे बॅनरही लावण्यात आलेत. आम्ही शिवसेने सोबत, अशा आशयाचे पोस्टर संजय राऊत यांच्या निवास असेलेल्या परिसरात लावण्यात आलेत. सुनिल राऊत सुद्धा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र संजय राऊत यांनी अखेर या वृत्ताचं खंडण केलंय. आपण मरेपर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

बंडखोरांचे आरोप आणि उत्तरं…

बंडखोर शिवसेना आमदारांनी महाविकास आघाडातील घटक पक्षांमुळे शिवसेनेचं खच्चीकरण आणि आमदारांना फंड मिळाला नाही, मुख्यमंत्र्यांची भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी तक्रार आणि आरोप केलेत. हिंदुत्वासाठी आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बंडखोरांनी केली होती.

पाहा व्हिडीओ :

आतापर्यंत 39 शिवेसना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर 50 हून जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला गेलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारसमोरील आव्हानं वाढली आहेत. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कोर्टात नेमकं काय घडंल, ायकेड सगळ्यांचं लक्ष लागलंय.

वाचा एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतरच्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच