शिर्डी परिक्रमेमुळे वादात, पण कोरोना काळातील कामामुळे राष्ट्रीय स्तरावर दखल; जाणून घ्या सदाशिव लोखंडेंचं राजकारण

गेल्यावर्षी कोरोना काळात सदाशिव लोखंडे यांनी उत्तमप्रकारे काम केले असले तरी शिर्डी परिक्रमा यात्रेतील सहभागामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. | Sadashiv Lokhande

शिर्डी परिक्रमेमुळे वादात, पण कोरोना काळातील कामामुळे राष्ट्रीय स्तरावर दखल; जाणून घ्या सदाशिव लोखंडेंचं राजकारण
सदाशिव लोखंडे, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:50 PM

मुंबई: कोरोनाच्या काळात प्रसिद्धीचा मोह टाळून भरीव काम केल्यामुळे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) काही महिन्यांपूर्वीच चर्चेत आले होते. कोरोनाच्या संकटकाळात आपापल्या मतदारसंघात वैद्यकीय मदतीमध्ये अग्रेसर असलेल्या देशपातळीवरील पहिल्या 25 खासदारांमध्ये सदाशिव लोखंडे यांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे प्रकाशझोतात आले होते. (Shiv Sena MP Sadashiv Lokhande political journey)

केंद्र सरकारच्या ‘गव्हर्न आय’ संस्थेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असताना शिर्डी मतदारसंघात भीतीचे वातावरण होते. त्यावेळी सदाशिव लोखंडे यांनी लोकांवर उपचार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सर्वतोपरी मदत पुरवली होती. शिर्डीत एकूण 70 आरोग्य केंद्रे आहेत. यापैकी प्रत्येक आरोग्य केंद्राला सदाशिव लोखंडे यांनी पीपीई किट, सॅनिटायझर आणि मास्कचा पुरवठा सुरळीतपणे होईल, याची काळजी घेतली होती. या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.

कोण आहेत सदाशिव लोखंडे?

सदाशिव लोखंडे यांचा जन्म 1 जून 1984 रोजी अहमदनगर येथे झाला. 1995 मध्ये ते कर्जत मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 आणि 2004 या दोन्ही निवडणुकांमध्ये विजय मिळवत सदाशिव लोखंडे यांनी आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केली. 2014 साली शिवसेनने शिर्डी मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस नेते भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला.

कोरोना काळात शिर्डी परिक्रमा यात्रेमुळे वादाच्या भोवऱ्यात

गेल्यावर्षी कोरोना काळात सदाशिव लोखंडे यांनी उत्तमप्रकारे काम केले असले तरी शिर्डी परिक्रमा यात्रेतील सहभागामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. देशात कोरोनाची साथ शिगेला असताना शिर्डीत 14 किलोमीटर अंतराची परिक्रमा यात्रा काढण्यात आली होती. सदाशिव लोखंडे हेदेखील यात्रेत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही त्याची पर्वा न करता लोखंडे यांनी साई परिक्रमेला उपस्थिती दर्शवली. प्रसारमाध्यमांनी याकडे लक्ष वेधलं असता त्यांनी त्यानंतर तेथुन काढता पाय घेतला होता.

‘दोन काय चार बायका सांभाळू शकतो’

राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्या दिवसापासून भाजपकडून सरकारला टोमणे मारले जात आहेत. मध्यंतरी भाजपचे नेते राम शिंदे यांनीही महाविकासआघाडील सरकारला असाच टोला लगावला होता. हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे, अशी खोचक टीका केली होती.

या टीकेला सदाशिव लोखंडे यांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते असल्याचा पलटवार लोखंडे यांनी केला होता.

‘जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातांवर गुन्हे दाखल करा’

काही दिवसांपूर्वीच सदाशिव लोखंडे यांनी थेट जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. निळवंडे कालव्याच्या पाहणीवेळी हा प्रकार घडला होता. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यावरून हा वाद पेटला होता.

या कालव्याची पाहणी करताना मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांनी गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरेंसह आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून 100 पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार सदाशिव लोखंडे केली होती.

(Shiv Sena MP Sadashiv Lokhande political journey)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.