Sanjay Raut : नऊ सरकारं पाडली, पण हे नववं पाडलेलं सरकार त्यांच्या नाकी नऊ आणेल, राऊतांचा हल्लोबल

Sanjay Raut : संजय राऊत यांनी भाजपवर आज सडकून टीका केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याचा दावा तुम्ही करता, पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. अडीच वर्षापूर्वी जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं असतं तर खऱ्या शिवसेनेच्या बाळासाहेबांचा मुख्यमंत्री करता आला असता ना?

Sanjay Raut : नऊ सरकारं पाडली, पण हे नववं पाडलेलं सरकार त्यांच्या नाकी नऊ आणेल, राऊतांचा हल्लोबल
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 10:37 AM

मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने (modi government) आतापर्यंत नऊ सरकारे पाडल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) टीका केली आहे. नऊ सरकारं पाडली, पण हे नववं पाडलेलं सरकार त्यांच्या नाकी नऊ आणेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली आम्ही शिवसेना पुढे घेऊन जाऊ. हीच शिवसेना पुढे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करेल, असा विश्वास व्यक्त करतानाच बाळासाहेबांचे आशीर्वाद असते, तर तुम्ही महाराष्ट्राचे आज मुख्यमंत्री असता, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना केला. तसेच जर 50 आमदारांच्या गटाला तुम्ही आज मुख्यमंत्रीपद दिलंय, तर 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद का नाकारलं? तेव्हाही हेच बंडखोर शिवसेनेत होते ना, असा सवालही त्यांनी केला. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

संजय राऊत यांनी भाजपवर आज सडकून टीका केली. बाळासाहेबांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्री केल्याचा दावा तुम्ही करता, पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. अडीच वर्षापूर्वी जर तुम्ही आमचं म्हणणं ऐकलं असतं तर खऱ्या शिवसेनेच्या बाळासाहेबांचा मुख्यमंत्री करता आला असता ना? त्यावेळीच शिवसेनेचं ऐकलं का नाही? जर 50 आमदारांच्या गटाला तुम्ही आज मुख्यमंत्रीपद दिलंय, तर 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्रीपद का नाकारलं? तेव्हाही हेच बंडखोर शिवसेनेत होते ना? असा सवाल राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा

ढोंग बंद करा

फुटिरांना तुम्ही आज खरे शिवसैनिक म्हणत आहात, ही ढोंगं बंद करा, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतोय, हे आमच्या मनाचं मोठेपण आहे, असंही ते म्हणाले. भाजप आता अटलजींचा पक्ष राहिलाय का?, असा सवालही त्यांनी केला.

अतिरेकी हल्ला झालाय का?

मुंबईवर अतिरेकी हल्ला झालाय का? अशी विचारणा करणारे अनेक फोन देशभरातील नेत्यांचे मला आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांचा गराडा विधानभवनाला पडल्याचं दाखवलं जात आहे. बंडखोरांना एवढं भय वाटण्याचं कारण काय? खुलेपणे समोर या, खुलेपणाने संवाद साधून दाखवा, असं आव्हानच त्यांनी केलं.

बंडखोर विधानभवनात

दरम्यान, आता थोड्यावेळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्व पक्षाचे आमदार विधानभवनात पोहोचले आहेत. बंडखोर आमदारही बसने विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हे आमदार विधानभवनात पोहोचले आहेत. आजच्या निवडणुकीत बंडखोर कुणाच्या बाजूने मतदान करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.