AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : शिवसेनेच्या याचिकेवर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड हाती येते आहे. राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात (Supreme Court) लिस्ट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे.

Maharashtra politics :  शिवसेनेच्या याचिकेवर आजच सुप्रीम कोर्टात सुनावणी
मुख्यमंत्र्यांची घणाघाती टीका Image Credit source: tv9
| Updated on: Jul 11, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड हाती येते आहे. राजकीय पेच असलेली याचिका अखेर कोर्टात लिस्ट झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज याप्रकरणी सुनावणी होणार हे स्पष्ट झालं आहे. शिवसेना (shivsena) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव यासह अनेक राजकीय गुंतागुंतीच्या जटील प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. याआधी 11 जुलैची म्हणजेच आजची तारीख देण्यात आली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आता राजकीय पेचाचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या याच निर्णयावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र ज्या आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. जे आमदार पक्षादेश असताना देखील बैठकांना उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशा मागणीची याचिका शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सर्व नियमाला धरूनच झाल्यामुळे निलंबनाचा प्रश्न येत नसल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तसेच न्यायालयात आमचाच विजय होईल अशा विश्वास देखील शिंदे गटाने व्यक्त केला आहे.

कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

दरम्यान या प्रकरणात शिवसेनेने जी याचिका दाखल केली होती.  त्यावर सुनावणीसाठी न्यायालयाने 11 जुलै म्हणजे आजची तारीख दिली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र आता हे प्रकरण कोर्टात लिस्ट झाल्याने त्यावर आजच सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. कारण याच निर्णयावर नव्या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज तरी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला दिलासा मिळणार का हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन