AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा धक्का, सुधाकर बडगुजरनंतर हे मोठे पदाधिकारी पक्ष सोडणार?

शिवसेना उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पक्षात आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली. पक्षात विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा धक्का, सुधाकर बडगुजरनंतर हे मोठे पदाधिकारी पक्ष सोडणार?
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Jun 27, 2025 | 11:19 AM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल लागली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्ष लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या शिवसेनेला मतदार पसंती देणार? हे ठरणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष मजबूत करत आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांना नाशिकमधून पुन्हा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर आणखी काही पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत. हे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 8 माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विलास शिंदे यांनी दिली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे देखील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.यामुळे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला लागली गळती अजूनही वाढली आहे.

विलास शिंदे म्हणाले, मी नाराज…

शिवसेना उबाठाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी पक्षात आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, प्रत्येक वेळेस मला डावलले गेले. काही सहन करण्याची सुद्धा सीमा असते. मी कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माझ्यासोबत 8 नगरसेवक आणि इतरही अनेक पदाधिकारी येणार आहेत. पक्षात माझी नाराजी स्थानिक नेत्यांवर आहे, असे विलास शिंदे यांनी म्हटले.

काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी सोडला पक्ष

शिवसेना उबाठाचा नाशिकचा गड कमकुवत होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उबाठातून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असताना बडगुजर यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे शिवसेना उबाठातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. अखेरी मुंबईत शेकडो पदाधिकाऱ्यांसोबत बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा