बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत.

बाळासाहेबांचे आवडते थापा, शिंदे गटात का गेले? यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 8:26 PM

मुंबई : शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. बाळासाहेबांची(Balasaheb Thackeray) सावली अशी ओळख असलेल्या चंपासिंह थापा(Champa Singh Thapa ) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

थापाचे मातोश्रीवर काही काम राहिलं नाही. तो बाळासाहेबांचा सेवक होता. तो गेला, का गेला? मला माहित नाही त्याला कोणी बोलवून घेतलं माहित नाही असं सावंत म्हणाले.

त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत. शिवसेनेतल्या अनेकांना फोन येत आहेत पैसे देतो या. विशेषत: शाखाप्रमुखांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

अदृश्य नेत्यांनी सांगितल असणार तुम्ही कोर्टात जाऊ नका म्हणून शिंदे गटाचे कुणी कोर्टात हजर राहत नाही असा टोला सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरुन लगावला आहे.

गुवाहाटी सुरत गोव्याचा खर्च तुम्ही कुठून केला ते सांगा. स्वतः नरकात बुडायचं आणि दुसऱ्यांकडे बोटं दाखवायची हे किळसवाण राजकारण महाराष्ट्रात कधी झालं नाही.

राम कदम यांच्या नावात राम आहे, ते शिल्लक आहे की नाही माहित नाही. बांगर यांच्या ताफ्यावर हल्ला झाला ? हा हल्ला नव्हता गदारांसाठी काय हार तुरे घेऊन जायचं का? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.