Aditya Thackeray : अजान सुरु झाली अन् आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं, पाहा नेमकं काय झालं…

अजान सुरु झाली अन् आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं.

Aditya Thackeray : अजान सुरु झाली अन् आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं, पाहा नेमकं काय झालं...
| Updated on: Jul 29, 2022 | 1:47 PM

मुंबई : सध्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) दौरा करत आहेत. यात ते लोकांशी संवाद साधत आहेत. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि शिवसेनेला बळ देण्यासाठी, शिवसैनिकांमध्ये ‘जाण’ आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अश्यात त्यांचा निष्ठा यात्रेतील सभेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात अजान होताना दिसत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपलं भाषण थांबवलं. आपण दोन मिनिटं थांबूया म्हणत त्यांनी आपलं भाषण काही काळ थांबवलं. त्याचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहेत. एकीकडे राज ठाकरेंचा (Raj Thackeray) अजानसाठी लावण्यात येणाऱ्या भोंग्याना तीव्र विरोध होत असताना त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे मात्र अजानचा (Ajan) आदर करताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे आजारी होते. तेव्हा हे गद्दार लोक काय करत होते. आमदार-खासदार गोळा करत होते… ही गोष्ट तुम्हा शिवसैनिकांना पटतेय का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. यावेळी प्रेक्षकांतून उत्तरं येत होती. त्याचवेळी अजान सुरु झाली. तेव्हा ‘मला वाटतं दोन मिनिटं थांबूया यांच्यासाठी…’ असं म्हणत आदित्य ठाकरे म्हणाले अन् काही मिनिटं वाट पाहिली अजान थांबली की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

राज ठाकरेंचा भोंग्यांना तीव्र विरोध

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागे काही सभा घेतल्या अन् त्यात अजान आणि भोंग्यांसदर्भात आक्रमक भूमिका घेतली त्यांनी वारंवार भोंगे बंद करण्याचं आवाहन केलं, तर प्रसंगी आव्हान देण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही. औरंगाबादच्या सभेत त्याच्या भाषणावेळी जेव्हा अजान झाली तेव्हा त्यांनी त्या भोंग्यांमध्ये तुम्ही बोळे कोंबा अन्यथा आम्हाला ते सगळं करायला वेळ लागणार नाही, असं आव्हान त्यांनी थेट भाषणाच्या मंचावरून दिलं.

आदित्य ठाकरेंकडून आदर

आदित्य ठाकरेंचा निष्ठा यात्रेतील सभेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात अजान होताना दिसत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपलं भाषण थांबवलं. आपण दोन मिनिटं थांबूया म्हणत त्यांनी आपलं भाषण काही काळ थांबवलं. त्याचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहेत.