Ajit Pawar : बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना जशाच तसे उत्तर..!

नुकसानीचे स्वरुप एवढे मोठे आहे का, सरकारने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचा मोडून पडलेला संसार पु्न्हा उभा राहणार आहे. खरिपातील पिके तर पाण्यात आहेतच पण शेतकऱ्यांच्या घराचीही पडझड झालेली आहे. आता हे सर्व नुकसान सरकारने भरुन द्यावे असे काही नाहीतर यासाठी काही संस्था पुढाकार घेत आहेत.

Ajit Pawar : बांधावरुनच समजतात शेतकऱ्यांच्या समस्या, राजकारणाची वेळ नाही अन्यथा दरेकरांना जशाच तसे उत्तर..!
विरोधी पक्षनेते अजित पवार
Image Credit source: tv9
गजानन उमाटे

| Edited By: राजेंद्र खराडे

Jul 29, 2022 | 1:46 PM

वर्धा : गेल्या दोन दिवसांपासून विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन (Crop Damage) पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आल्याशिवाय नुकसानीची दाहकता ही लक्षात येत नाही, असे म्हणत त्यांनी (State Government) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला आहे. पावसामुळे केवळ शेतीचेच नुकसान झाले असे नाही तर घरांचीही पडझड झाली आहे. नुकसानीची तीव्रता पाहता नियम-अटी बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. शिवाय हा दौरा केवळ शेतकऱ्यांसाठी आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही. असे असतानाही कोणी प्रश्न उपस्थित केले तर त्यांना मात्र, जशाच तसे उत्तरही दिले जाईल असेही त्यांनी प्रवीण दरेकर यांना सुनावले आहे. बांधावरची स्थिती ही वेगळी असून त्वरीत मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

नियम बाजूला सारुन मदत गरजेची

नुकसानीचे स्वरुप एवढे मोठे आहे का, सरकारने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम बाजूला सारुन शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांचा मोडून पडलेला संसार पु्न्हा उभा राहणार आहे. खरिपातील पिके तर पाण्यात आहेतच पण शेतकऱ्यांच्या घराचीही पडझड झालेली आहे. आता हे सर्व नुकसान सरकारने भरुन द्यावे असे काही नाहीतर यासाठी काही संस्था पुढाकार घेत आहेत. मात्र, गरज पडेल तिथे सरकारने माघे न सरकता थेट मदतीचे धोरण अवलंबणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

मी कसा आहे माहितेय..राजकारण नको

अजित पवार यांच्या नुकसान पाहणीच्या दौऱ्यावरुन प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केले होते. हा दौरा म्हणजे वरातीमागून घोडे असे झाले आहे. सर्वत्र पीक पंचनामे होत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या सहाभुतीसाठी ह सर्व चालले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, जे काही शेतकरी सांगत आहे तेच आपण बोलत आहोत. मुंबईत बसून त्यांना काय समजणार शेतकऱ्यांचे प्रश्न, ही राजकारण करायची वेळ नाही आणि त्यांनाही माहितेय माझा स्वभाव.. असे आरोप होत असतील तर जशाच तसे उत्तर दिले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

उंटावरुन शेळ्या राखू नका

मुंबईत राहून शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात येणार नाही. त्यासाठी स्थानिक पातळीवर यावेच लागणार आहे. अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्ष असलेली स्थिती यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करा अथवा न करा पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. सर्वकाही मुंबईत राहूनच मार्गी लागणार नाही तर बांधावर येणेही महत्वाचे असल्याचे म्हणत अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें