बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल

| Updated on: Jul 31, 2021 | 5:53 PM

मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं? (shivsena bhavan turn as collection center, nitesh rane attacks on shivsen)

बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, ते तर कलेक्शन ऑफिस; नितेश राणेंचा हल्लाबोल
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us on

मुंबई: मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. त्यामुळे शिवसेना भवनसमोर कार्यालय उघडलं असेल तर बिघडलं कुठं?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांचं शिवसेना भवन आता राहिलं नाही. आताचं शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. (shivsena bhavan turn as collection center, nitesh rane attacks on shivsen)

माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नाही. मुंबई ही आमचीही आहे. आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो कि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले.

मुंबईत काम करण्यास बंदी आहे का?

भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे. आम्हाला भवन फवनचा फरक पडत नाही. मुंबईत आम्ही कुठेही काम करू शकतो. बंदी आहे का? असा सवाल त्यांनी केला.

जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार

मुंबईत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर आमचा जोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कार्यालय स्थापन केलं आहे. आता आम्ही मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात जाणार. महापालिका निवडणुका येईपर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आमचे काम सुरूच राहील, असं सांगतानाच हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं सांगितलं जातं. जिथे पाणी लोकांना मिळत नाही, तो बालेकिल्ला. जिथे कचऱ्याचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला. जिथे धुळीचं साम्राज्य आहे, तो बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि उद्या हाच बालेकिल्ला आमचा करू, असंही ते म्हणाले. (shivsena bhavan turn as collection center, nitesh rane attacks on shivsen)

 

संबंधित बातम्या:

मंत्रीपद जाताच बाबुल सुप्रियोंचा राजकारणालाच रामराम; फेसबुकवरून घोषणा

ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिकेत दाखवून देऊ; नाना पटोलेंचा इशारा

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

(shivsena bhavan turn as collection center, nitesh rane attacks on shivsen)