AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या

अ‌ॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बँकेत नोकरी लावण्याचे आमिष, शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक, मुंबई पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 31, 2021 | 5:25 PM
Share

मुंबई : अ‌ॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुण-तरुणींची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटने अ‌ॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे अनेकांना प्रलोभन दिले होते. या प्रकरणी मुंबईच्या पायधुनी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून मोबाईलसह इतर संशयास्पद साहित्य जप्त केले आहे. (Mumbai police arrested three people for allegedly defrauding hundreds of people by offering them bank jobs)

दिल्लीवरुन चालवायचे रॅकेट

मिळालेल्या माहितीनुसार अ‌ॅक्सिस बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांना फसवणारे एक रॅकेट सक्रिय झाले होते. त्याची माहिती मुंबईच्या पायधुनी पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करण्याचे ठरवले. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी मोठ्या शिताफीने तीन आरोपींना ताब्यात घेतलं. हे आरोपी दिल्लीमधून लोकांना फसवायचे.

आरोपींकडून मोबाईल, एटीएम, डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक जप्त

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लोकांना लुटणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केले आहे. तसेच या आरोपींकडून अनेक संशयास्पद साहित्य जप्त केलेय. पोलिसांनी त्यांच्या कारवाईत अनेक मोबाईल, एटीएम, डेबिट कार्ड, बँकेचे पासबुक, आधार कार्ड आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

आरोपींची कसून चौकशी

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नोकरीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अनेक तरुण आणि तरुणींना ही टोळी फसवत होती. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून ही टोळी पैसे उकळत होती. मात्र, पायधुनी पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलीस अटक केलेल्या तीन आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Kamal Sadanah | पत्नी-मुलीची हत्या करुन निर्मात्याने संपवलं होतं कुटुंब, गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो, वाचा रिअल लाईफ ट्रॅजेडी

Axis बँकेचा मॅनेजर, ICICI बँकेचा माजी मॅनेजर, तरीही दरोडा का टाकला?

(Mumbai police arrested three people for allegedly defrauding hundreds of people by offering them bank jobs)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.