Kamal Sadanah | पत्नी-मुलीची हत्या करुन निर्मात्याने संपवलं होतं कुटुंब, गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो, वाचा रिअल लाईफ ट्रॅजेडी

काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने कमल सदाना याने आपल्या आयुष्यातील भळभळती जखम सांगितली होती. 21 ऑक्टोबर 1990. कमलचा विसावा वाढदिवस. बर्थडे पार्टीसाठी तो तयारी करत असतानाच आई-वडिलांमधील भांडणांचे आवाज त्याच्या कानावर पडले. त्यापाठून गोळ्यांचे एका मागोमाग एक आवाज त्याच्या कानावर आले

Kamal Sadanah | पत्नी-मुलीची हत्या करुन निर्मात्याने संपवलं होतं कुटुंब, गोळीबारातून वाचलेला तरुण झाला बेखुदी सिनेमाचा हिरो, वाचा रिअल लाईफ ट्रॅजेडी
kamal sadanah
अनिश बेंद्रे

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 31, 2021 | 7:28 AM

मुंबई : 1992 मध्ये अभिनेत्री काजोलसोबत ‘बेखुदी’ चित्रपटातून एका नवख्या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही, मात्र त्याचा चेहरा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. हा अभिनेता म्हणजेच कमल सदाना (Kamal Sadanah). अभिनेत्री दिव्या भारतीसोबत भूमिका असलेला त्याचा ‘रंग’ हा सिनेमा पुढच्याच वर्षी बॉक्स ऑफिसवर दणकून चालला. मनोरंजन विश्वात नशीब आजमावू पाहणाऱ्या या अभिनेत्याच्या दुर्दैवाचे दशावतार फारशा प्रेक्षकांना माहिती नव्हते, किंवा विस्मरणात गेले होते. कमल सदानाचे वडील आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ब्रीज सदाना (Brij Sadanah) यांनी पत्नी-अभिनेत्री सईदा खान (Sayeeda Khan) आणि मुलगी नम्रता यांची हत्या करुन आत्महत्या केली होती. कमल आपल्या विसाव्या वाढदिवशी घडलेल्या या भीषण हत्याकांडातून बालंबाल बचावला होता. 21 ऑक्टोबर 1990 रोजी ही घटना घडली होती. कमलने आता वयाची पन्नाशी पार केली आहे.

काय घडलं त्या रात्री?

काही वर्षांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने कमल सदाना याने आपल्या आयुष्यातील भळभळती जखम सांगितली होती. 21 ऑक्टोबर 1990. कमलचा विसावा वाढदिवस. बर्थडे पार्टीसाठी तो तयारी करत असतानाच आई-वडिलांमधील भांडणांचे आवाज त्याच्या कानावर पडले. त्यापाठून गोळ्यांचे एका मागोमाग एक आवाज त्याच्या कानावर आले. खालच्या मजल्यावर तो धावत गेला, तर बहीण आणि आई बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ब्रीज यांनी कमलवरही गोळी झाडली, मात्र ती त्याच्या मानेला चाटून गेली आणि त्याची शुद्ध हरपली. त्यानंतर ब्रीज यांनी गोळी झाडून स्वतःचं आयुष्यही संपवलं.

न सुटलेलं कोडं

वडिलांनी टोकाचं पाऊल का उचललं, हे कोडं त्याला आजवर सुटलेलं नाही. आर्थिक चणचण असल्याचे दावे कमलने फेटाळून लावले होते. अनेक ठिकाणी आमच्या कुटुंबाने गुंतवणूक केली होती, त्यामुळे पैशांची निकड हा मुद्दाच नाही, असं कमल ठामपणे सांगतो. दिग्दर्शक महेश भट्ट यांचं एक वाक्य त्याला या घटनेच्या वर्णनासाठी आठवतं. प्रत्येकामध्ये एक जिवंत विद्युत तार असते, मात्र काही जण तिचा झटका बसून गतप्राण होतात.

वयाच्या 16 व्या वर्षी कमलने वडिलांसाठी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वडील आपल्याला शूटिंगला, एडिटिंग रुमला आणि लॅबमध्येही न्यायचे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ करता, तेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ नाही, तर भविष्य बदलता, अशी वडिलांची आठवण कमलने सांगितली होती.

सोहा अलीसोबत बहिणीचं नातं

मोठ्या दुर्घटनेतून बचावलेल्या कमलने काजोलसोबत ‘बेखुदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. पण तो फारसा चालला नाही. पुढे ‘रंग’ सिनेमानंतर नव्वदच्या दशकात त्याने काही चित्रपटात भूमिका केल्याही, मात्र त्या सिनेमासारखं यश त्याच्या वाट्याला आलं नाही. सैफ अली खान त्याचा बॉलिवूडमधला बेस्ट फ्रेण्ड. त्यांचे कौटुंबिक संबंध इतके चांगले, की सैफची बहीण म्हणजेच अभिनेत्री सोहा अली खान दरवर्षी त्याला राखी पाठवायची.

सेकंड इनिंग

2006 मध्ये एकता कपूरच्या ‘कसम से’ मालिकेतून कमलने छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. वडिलांनी 1972 मध्ये गाजवलेल्या ‘व्हिक्टोरिया नंबर 203’ सिनेमाच्या रिमेकची निर्मिती 2007 मध्ये त्याने केली. त्याने दिग्दर्शित केलेला कर्कश हा सिनेमा फेस्टिव्हल्समध्ये गाजला, पण सिनेमागृहापर्यंत पोहोचलाच नाही. तर 2014 मध्ये रोअर – टायगर्स ऑफ द सुंदरबन या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन त्याने केले होते. मात्र या सिनेमालाही फारसं यश मिळालं नाही.

संबंधित बातम्या :

Silk Smitha | मैत्रिणीला फोन करुन बोलावलं, पण ती येण्याआधीच गळफास घेतला, सिल्क स्मिताचं वादळी आयुष्य

Prathyusha Suicide | वयाच्या 20 व्या वर्षी बॉयफ्रेण्डसोबत विषप्राशन, अशी झाली होती अभिनेत्री प्रत्युषाच्या आयुष्याची अखेर

(Tragic Story of Bekhudi Fame Bollywood Actor Kamal Sadanah Father killed wife daughter on his 20th birthday)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें