शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सभेचं स्थळ आणि तारीख ठरली!

मुंबई : स्वबळाचा नारा देत गेली दोन-अडीच वर्षे सत्तेत राहून सत्तेविरोधात बोलणाऱ्या शिवसेनेने नाही नाही म्हणता भाजपसोबत सख्य जमवलं आणि लोकसभा निवडणुकीसाठी युतीही केली. या युतीचे साईड इफेक्ट्स सुरु असताना, आता एकत्रित प्रचाराचाही नारळ फोडला जाणार आहे. शिवसेना आणि भाजपची पहिली जाहीर सभा 24 मार्चला कोल्हापुरात होणार आहे. शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर, काल मुख्यमंत्री देवेंद्र …

शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सभेचं स्थळ आणि तारीख ठरली!

मुंबई : स्वबळाचा नारा देत गेली दोन-अडीच वर्षे सत्तेत राहून सत्तेविरोधात बोलणाऱ्या शिवसेनेने नाही नाही म्हणता भाजपसोबत सख्य जमवलं आणि लोकसभा निवडणुकीसाठी युतीही केली. या युतीचे साईड इफेक्ट्स सुरु असताना, आता एकत्रित प्रचाराचाही नारळ फोडला जाणार आहे. शिवसेना आणि भाजपची पहिली जाहीर सभा 24 मार्चला कोल्हापुरात होणार आहे.

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मातोश्रीवर लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी गेले होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23, तर भाजपा 25 जागा लढवणार आहे. त्यामुळे युतीच्या उमेदवारांचा प्रचार एकदिलाने करण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच युतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्र मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. येत्या 15, 17 आणि 18 मार्च हे मेळावे  महाराष्ट्रात 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांत होणार आहेत.

तसेच, पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यांनंतर महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराचा नारळ 24 मार्च रोजी कोल्हापुरात फोडण्यात येणार आहे. कोल्हापुरात अंबाबाईचं महालक्ष्मीचं दर्शन युतीचे नेते घेतील आणि युतीचा प्रचार सुरु होईल. शिवसेना-भाजप युतीच्या घोषणाही येत्या दोन दिवसांत होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *