AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजप ‘युतीचे शिल्पकार’ नीरज गुंडे मातोश्रीवर!

शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाचं घोडं अडल्याची चर्चा असताना यावेळी गुंडे यांनी 'मातोश्री'साठी कोणता निरोप आणला? याची चर्चा रंगली आहे.

शिवसेना-भाजप 'युतीचे शिल्पकार' नीरज गुंडे मातोश्रीवर!
| Updated on: Sep 15, 2019 | 3:01 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचं अडलेलं घोडं पुढे नेण्यासाठी ‘युतीचे शिल्पकार’च शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी (Niraj Gunde on Matoshree) आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नीरज गुंडे ‘मातोश्री’वर (Niraj Gunde on Matoshree) आले आहेत.

नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे मित्र मानले जातात. शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाचं घोडं अडल्याची चर्चा असताना यावेळी गुंडे यांनी ‘मातोश्री’साठी कोणता निरोप आणला? याची चर्चा रंगली आहे. नीरज गुंडे यांनी ‘चहा पिण्यासाठी आलो आहे’ अशी सूचक प्रतिक्रिया देत युतीबाबत भाष्य (Niraj Gunde on Matoshree) करणं टाळलं.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची बोलणी होण्यासाठी नीरज गुंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती पुन्हा सांधण्यासाठी नीरज गुंडे हे शिवसेना आणि भाजपमधला दुवा ठरले होते.

2014 मधील विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यावेळी भाजपला 122, तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती केली. शिवसेना सत्तेत सहभागी झाली असली, तरी त्यांची भूमिका विरोधी पक्षासारखी दिसली.

2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपाध्यक्ष अमित शाह, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याची घोषणा केली होती. या युतीमागे नीरज गुंडे यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.

विधानसभेला युती कायम राहील, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र दरम्यानच्या काळात दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची चाचपणी केल्यामुळे युतीबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

कोण आहेत नीरज गुंडे?

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेतला दुवा. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत मित्र.

राजकारणात फारसा प्रकाशझोतात नसलेला चेहरा, पण चर्चेच्या खलबतांमध्ये पडद्याआड सूत्र हलवणारे म्हणून ओळख.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील महापौर निवासाची जागा हस्तांतरण कार्यक्रमावेळी फडणवीस-ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चेवेळी उपस्थित राहिल्याने गुंडे चर्चेत आले होते.

चेंबुरमध्ये राहणाऱ्या नीरज गुंडे यांच्या निवासस्थानीही त्यावेळी फडणवीस-ठाकरे यांच्या काही बैठक झाल्याची सूत्रांची माहिती.

गुंडे यांचा कॉर्पोरेट क्षेत्राही संबंध आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत. मुंबई भेटीवर आलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांच्याबरोबर गुंडे यांची अनेकदा ‘मातोश्री’वारी झाली.

देशात क्रिकेट क्षेत्रातही नीरज गुंडे यांचा दबदबा आहे. क्रिकेट क्षेत्रातील अनेक अनियमितता, भ्रष्टाचार गुंडे यांनी उजेडात आणला होता. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या एव्हीएशन खाते भ्रष्टाचार तसंच टू जी घोटाळा प्रकरणातील माहिती बाहेर आणण्यात गुंडे यांची भूमिका होती.

मातोश्रीवर स्वबळाची चाचपणी

एकीकडे, मातोश्रीवर शिवसेनेचे खासदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना स्वबळाची चाचपणी करण्यासाठी बैठका घेत असल्याच्या चर्चा सुरु असताना नीरज गुंडे यांच्या ‘मातोश्री’वारीने युतीच्या पक्षात असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा (Prasad Lad Shivsena BJP Alliance) 19 सप्टेंबरला होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत सेना-भाजप एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब (Prasad Lad Shivsena BJP Alliance) होण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.