सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, शिवसेना नगरसेवकाचा अमृता फडणवीसांवर पलटवार

सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादांची बुद्धी भ्रष्ट केली, शिवसेना नगरसेवकाचा अमृता फडणवीसांवर पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील अमृता फडणवीसांच्या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी उत्तर दिलं आहे

अनिश बेंद्रे

|

Dec 23, 2019 | 7:56 AM

मुंबई : सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली, असं म्हणत शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘फक्त आडनाव ठाकरे असून चालत नाही’ अशी बोचरी टीका मिसेस फडणवीसांनी (Shivsena Corporator on Amruta Fadnavis) केली होती.

‘इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचाच मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो!’ असं ट्वीट घोले यांनी केलं आहे. त्यापुढे #ठाकरेठाकरेच! #आजच्याआनंदीबाई असे दोन हॅशटॅग द्यायलाही अमेय घोले विसरलेले नाहीत.

अमेय घोले हे युवासेनेचे कोषाध्यक्ष आहेत. तर मुंबई महापालिकेत वडाळा मतदारसंघातून नगरसेवक आहेत.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. ‘राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय आहे! वीर सावरकर आणि त्यांची महानता किंवा सत्कार्यांच्या जवळपासही राहुल गांधी पोहचत नाहीत. इतकंच नव्हे, तर त्यांनी स्वत:ला ‘गांधी’ समजण्याची चूकही करु नये! कोणीही गांधी आडनाव लावून ‘गांधी’होऊ शकत नाही!’ असं ट्वीट फडणवीसांनी केलं होतं.

देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.

याआधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडसाठी वृक्षतोडीला दिलेल्या स्थगितीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहेत, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोर आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होवो,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

Shivsena Corporator on Amruta Fadnavis

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें