येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला

येवल्यातून छगन भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार ठरला

शिवसेनेने छगन भुजबळ यांच्याविरोधातील आपल्या उमेदवाराची (Shivsena Candidate against Chhagan Bhujbal) घोषणा केली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Oct 01, 2019 | 12:00 AM

नाशिक: शिवसेनेने आपले पत्ते उघडले असून छगन भुजबळ यांच्याविरोधातील उमेदवाराची (Shivsena Candidate against Chhagan Bhujbal) घोषणा केली. शिवसेनेने येवल्यातून संभाजी पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक (Assembly Election) लढणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं. दरम्यान काही काळ ते शिवसेनेत परतणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, त्यांनी वारंवार याला नकार दिला होता.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः संभाजी पवार यांनी येवल्यातून उमेदवारीसाठी शिवसेनेचा एबी फॉर्म दिला. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांचाही शेवट झाला आहे. आता येवल्यातून शिवसेनेच्या संभाजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यात लढत रंगणार आहे.

Sambhaji Pawar Yeola Shivsena

(संभाजी पवार यांनी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.)

भुजबळ यांनी देखील मागील काही काळापासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यामुळे येथे भुजबळच प्रमुख दावेदार मानले जात आहे.

शिवसेनेकडून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेतील इच्छुक उमेदवार संभाजी पवार आणि रुपचंद भागवत यांच्यात स्पर्धा होती. अखेर संभाजी पवार यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनीही उमेदवारीसाठी दावा केला होता.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी गणपती उत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या. येवला येथील शिवसेनेच्या महाराष्ट्र मित्र मंडळ गणपती मंडळालाही त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी घोषणा देत भुजबळांचे स्वागत केले होते. भुजबळांनी लवकर सेनेत प्रवेश करावा, अशी मागणीही त्यावेळी शिवसैनिकांनी केली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें