AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच? संजय राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे जे करतात ते थेट

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सध्या सुरूच आहे. इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत म्हटंले आहे की, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे शिवसेनाच आहे, शिंदे हे सर्व काही शिवसेनेच्या इशाऱ्यावर करत आहेत.

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच? संजय राऊत म्हणतात, उद्धव ठाकरे जे करतात ते थेट
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 22, 2022 | 3:55 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडी सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 40 आमदार फोडले आहेत, असा दावा स्वत: एकनाथ शिंदे यांनीचे केलायं. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून वेगळा गट स्थापन केला. या गटात दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय अपक्षांचा पाठिंबा घेऊन ते भाजपसोबत सत्तास्थापन करणार असल्याचे देखील स्पष्ट आहे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) असल्याचा आरोप केला जातोयं. यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सध्या सुरूच आहे. इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोट दाखवत म्हटंले आहे की, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे शिवसेनाच आहे, शिंदे हे सर्व काही शिवसेनेच्या इशाऱ्यावर करत आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं, राऊत म्हणाली की उद्धव ठाकरे जे करतात ते थेट करतात. तसेच राऊत पुढे म्हणाले की, एकट्या शिंदेंकडून ऐकढं नियोजन शक्यच नाहीये. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी मागे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नेत्यांमध्ये अभुतपूर्व गोंधळ

बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांनी अपक्ष आमदारांना संपर्क साधलायं. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाही तातडीने मुंबईला बोलावले असल्याचे कळते आहे. चंद्रकांत पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री तसेच राज्यपाल या दोन्हांनी कोरोनाची लागण झालीये. यामुळे सत्तासंघर्षामध्ये कोरोनाने देखील प्रवेश केलायं. मुख्यमंत्र्याना कोरोनाची लागण झालीये, यावरही राज्यातील नेत्यांमध्ये अभुतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. मुख्यमंत्र्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मात्र, आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलीये.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?