शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद पाळा, संजय राऊतांचं आवाहन

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा," असं आवाहनही संजय राऊतांनी केले. (Sanjay Raut on Farmer Protest Bharat Bandh)

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद पाळा, संजय राऊतांचं आवाहन
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 10:51 AM

मुंबई : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. (Sanjay Raut on Farmer Protest Bharat Bandh)

“महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा,” असं आवाहनही संजय राऊतांनी केले.

“शेतकरी हा संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला साथ द्यावी,” असेही राऊत म्हणाले.

“गेल्या 10-12 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला ला हआहे. थंडीत आंदोलनाला बसला आहे. 2010 ची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ञ समजले जातात,” असेही राऊतांनी सांगितले

“कोणताही नेता शेतकऱ्यांच्या भावनेशी प्रतारणा करणार नाही. हा विषय देशव्यापी झाला आहे. सरकारनं दिल्लीत मागच्या 12 दिवसांपासून दडपशाही सुरु केली आहे. म्हणून स्वेच्छेन या बंदमध्ये सहभागी व्हावं,” असे आवाहन संजय राऊतांनी जनतेला केलं आहे. (Sanjay Raut on Farmer Protest Bharat Bandh)

संबंधित बातम्या : 

Bharat Bandh : उद्या नाही मिळणार दूध-फळ आणि भाज्या, फक्त ‘या’ सेवा राहणार सुरू

FARMER PROTEST | शरद पवार ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतायत?

Non Stop LIVE Update
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.