शिवसेना आमदार योगेश कदम अजित पवारांच्या भेटीला

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्वपूर्ण विषयांसाठी ही भेट झाल्याचं कदम यांनी सांगितलं (Shivsena MLA Yogesh Kadam meets Deputy CM Ajit Pawar)

शिवसेना आमदार योगेश कदम अजित पवारांच्या भेटीला

रत्नागिरी : शिवसेना आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बागायतीच्या प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी कदम यांनी केली. (Shivsena MLA Yogesh Kadam meets Deputy CM Ajit Pawar)

योगेश कदम हे शिवसेनेकडून खेड दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांचे ते पुत्र. ‘निसर्ग’ चक्रीवादळाला आज एक महिना पूर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्वपूर्ण विषयांसाठी ही भेट झाल्याचं कदम यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.

हेही वाचा : कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर

वादळात घरांप्रमाणे मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागायतीच्या प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी योगेश कदम यांनी केली. त्याचप्रमाणे शेती कर्ज घेतलेल्या बागायतदारांची कर्ज माफ करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

प्रत्येक झाडामागे मदत देण्यासाठी सकारात्मक विचार होईल, असं आश्वासन योगेश कदम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.

एकंदरीत परिस्थितीबाबत झालेल्या चर्चेनंतर दापोली मतदारसंघाला तसेच संपूर्ण कोकणाला न्याय मिळवून देण्याचे, नुकसानग्रस्त परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे कदम यांनी सांगितले. (Shivsena MLA Yogesh Kadam meets Deputy CM Ajit Pawar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *