AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…, ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा वरळी डोममध्ये पार पडणार आहे. यासाठी मुंबईत जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली असून मराठी जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. “आवाज मराठीचा!” या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला विजयी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.

चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला..., ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
| Updated on: Jul 04, 2025 | 3:06 PM
Share

शनिवारी (5जुलै) सकाळी 10 वाजता मुंबईतील वरळी डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजयी मेळावा पार पडणार आहे. या ऐतिहासिक मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईत जागोजागी बॅनरबाजी करण्यात आली असून मराठी जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. “आवाज मराठीचा!” या भावनिक संदेशासह ठाकरे बंधूंनी जनतेला विजयी मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा भव्य विजय मेळावा पार पडण्याआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पक्षातून गेलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा घरवापसीचे खुले आवाहन करणारे बॅनर मुंबईत झळकले आहेत. “चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेलेल्यांनी आता परत मुंबईत या, नाहीतर गुजरातला जाल,” अशा मजकुराचे बॅनर ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेकडून लावण्यात आले आहेत. याद्वारे शिवसैनिकांना आणि नेत्यांना घरवापसीचे आवाहन करण्यात आले आहे.

वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यात ठाकरे बंधू कार्यकर्त्यांना काय आदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र या आदेशांपूर्वीच ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेने ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. आणखी एका बॅनरद्वारे “महाराष्ट्रात मराठी… मराठीसाठी ठाकरेच ! ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या कोण-कोणत्या मराठी महाराष्ट्र द्रोही लोकांना सरळ करायचा आहे आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत” असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर “ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!” आणि “ब्रँड मराठीचा” असे बॅनरही वरळी परिसरात झळकले आहेत.

वरळी परिसरातील आणखी एका बॅनरवर “आवाज मराठीचा! मराठी एकजुटीचा विजय असो आपला माणूस” असे संदेश देणारे बॅनरमुळे लावले आहेत. तसेच या बॅनरमध्ये राज आणि उद्धव ठाकरे गळाभेट घेताना, बाळासाहेब ठाकरे त्यांना आशीर्वाद देताना दाखवले आहे तसेच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तसेच दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, खासदार-आमदार यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. झळकले असल्याचे दिसत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांनी.

वरळी डोममध्ये होणाऱ्या भव्य विजयी मेळाव्याच्या तयारीचा आढावा माझी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला. पेडणेकर यांनी हॉलमध्ये असणारं स्टेज, एलईडी लाइट्स, एलईडी स्क्रीन, कार्यकर्त्यांना बसण्याची आसन व्यवस्था पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी पेडणेकर यांनी एक समुद्र समोर आहे आणि उद्या शिवसेनेचा इतिहास असणारा वरळी डोम दुसरा मानवी समुद्र पाहणार आहे असं पेडणेकर यांनी म्हटलं.

राज्याच्या विविध भागातून विजयी मेळाव्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. धाराशिव जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईसाठी रवाना झाले आहेत. मेळाव्याचा टीचर पाहिल्यानंतरच सगळ्यांना मेळाव्याची भव्यता दिसत आहे असं कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.