दोन काय चार बायका सांभाळू शकतो, शिवसेना खासदाराकडून राम शिंदेंना प्रत्युत्तर

| Updated on: Aug 01, 2020 | 6:14 PM

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात (Sadashiv Lokhande Criticizes Ram Shinde) आलं.

दोन काय चार बायका सांभाळू शकतो, शिवसेना खासदाराकडून राम शिंदेंना प्रत्युत्तर
Follow us on

अहमदनगर : “हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला संसार आहे”, अशी खरमरीत टीका माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांनी केली होती. या टीकेला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सडेतोड उत्तर दिले. “ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो, असे आमचे नेते आहेत, असे सदाशिव लोखंडे म्हणाले. (Sadashiv Lokhande Criticizes Ram Shinde)

“दुधाचे शेतकरी व्याकूळ झाले आहे. त्यांना पैसे मिळत नाही ही खरी गोष्ट आहे. मात्र दुधाच्या पदार्थांना देखील भाव मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी दिली पाहिजे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे,” अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.

राम शिंदे नेमकं काय म्हणाले?

राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरमधील सोलापूर-नगर महामार्गावर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

“आजचं आंदोलन महाराष्ट्रातील तिगडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता अडचणीत आली आहे. त्यामुळे सरकारचे कान उघडण्यासाठी आज हे आंदोलन करत आहोत” असं राम शिंदे म्हणाले.

“हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका आणि त्यामधून अडचणीत आलेला हा संसार आहे. घरातला कर्ता माणूस कोपर्‍यात बसला आहे, प्रजा आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. आमच्या सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचे ठरवले होतं. मात्र या सरकारने अनुदान दिले नाही” असा आरोप राम शिंदे यांनी केला होता.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्याचं हातवर पोट आहे, त्याला कुठलीही मदत राज्य सरकारने केली नाही, फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे काम महाराष्ट्र सरकार करत आहे, असंही टीकास्त्र राम शिंदे यांनी सोडलं. (Sadashiv Lokhande Criticizes Ram Shinde)

संबंधित बातम्या : 

हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका, राम शिंदे यांचं टीकास्त्र

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टोकाची टीका, गावात सोडलेल्या वळूची उपमा