Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल….

काल शिंदे आणि फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातील काही मंत्र्यांवर आरोप आहेत. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली. ते म्हणाले, ' महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता...9 ऑगस्टचा क्रांती दिन. ज्यांना चलेजाव म्हणायला पाहिजे होतं. त्यांचा शपथविधी झाला.

Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल....
शिवसेना खासदार अरविंद सावंतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 1:24 PM

मुंबईः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) विसरलात का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बंडखोर आमदारांना केला. शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून अरविंद सावंतांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना पक्षावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दावा न सांगता त्यांना वेगळा पक्ष काढायचा असल्यास तो काढावा, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. पवारांच्या या वक्तव्याला दुजोरा देताना अरविंद सावंत म्हणाले, उद्धव ठाकरेदेखील हेच सांगतायत. त्यांना बाहेर पडायचंय तर आमचं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह सोडावं…पण शिवसेना सोडण्याची या लोकांची हिंमत नाही. सत्तेसाठी खोटं बोलून उद्धव ठाकरेंवर धडाधड आरोप करत सुटलेत, अशी धारदार टीका अरविंद सावंत यांनी केली.

‘याच घराण्यामुळे आम्ही असामान्य झालो’

शिवसेनेच्या ठाकरे घराण्यामुळेच असंख्य लोक सामान्यांचे असामान्य झाले, अशी आठवण अरविंद सावंत यांनी यावेळी करून दिली. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचे आमदार काल शपथविधीच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायला विसरले. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत. ज्या घराण्यानं महाराष्ट्रातील सामान्य माणसांना असमान्य केलं. आमच्यासारखे कारकून होते, ते आज मोठ्या पदावर पोहोचलेत. त्या घराण्यानं स्वतःसाठी काय घेतलं.. पहिल्यांदा त्या घराण्यातला एकजण आमदार होतोय. तो एक मुख्यमंत्री होतोय तर काय बिघडलं… का त्यांच्या पाठित सुरा खुपसला? असं काय खोटं बोलायचं? उद्धवजी भेटत नाहीत हे तर धादांत खोटंय….

‘महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद दिवस’

काल शिंदे आणि फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यातील काही मंत्र्यांवर आरोप आहेत. यावरून अरविंद सावंत यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राला लांछन लागण्याचा दिवस होता…9 ऑगस्टचा क्रांती दिन. ज्यांना चलेजाव म्हणायला पाहिजे होतं. त्यांचा शपथविधी झाला. कुणाच्या मुलीचं टीईटी घोटाळ्यात नाव आलंय. कुणावर महिलेवर अत्याचाराचे आरोप आहेत. देवेंद्र फडणवीसांचं संजय राठोडांवर पूर्वी केलेलं भाष्य ऐका. त्यांना जे धुलाई मशीन नाव दिलंय ते अगदी योग्य आहे. काहीही करा, आमच्याकडे या पावन होतात…. ही सगळी जनतेच्या मनातून उतरलेली माणसं आहेत. ..

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.