कंगना हा विषय आमच्यासाठी संपला, याबाबत चर्चा करणं सोडून दिलंय : संजय राऊत

| Updated on: Sep 10, 2020 | 4:19 PM

"कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणं सोडून दिलं आहे," अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. (Sanjay Raut On Kangana Ranaut issue)

कंगना हा विषय आमच्यासाठी संपला, याबाबत चर्चा करणं सोडून दिलंय : संजय राऊत
पालिकेने अनधिकृतपणे माझे घर उद्ध्वस्त केले, तेव्हा मी रडले होते.
Follow us on

मुंबई : “बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला. आम्ही याबाबत चर्चा करणं सोडून दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी कडवट टीका कंगना रनौतने केली होती. त्यापूर्वी कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. (Sanjay Raut On Kangana Ranaut issue)

या चर्चेत कंगनासह अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर “कंगना प्रकरणी काहीही बोलायचं नाही, असा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“कंगना प्रश्नी काहीही बोलायचे नाही, असा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पक्षासंदर्भात चर्चा झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज असल्याची अफवा पसरवू नका,” असं काहीही नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

“कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही ते विसरुन गेलोय. आम्ही आमच्या नेहमीच्या सामाजिक, राजकीय कामाला लागलोय. ती काय ट्विट करतेय, ते वाचले नाही. आम्ही फक्त सामना वाचतो,” असेही संजय राऊत म्हणाले.

कंगना उद्धव ठाकरेंना काय म्हणाली?

“उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घरं तोडून फार मोठा सूड उगवलात. आज माझं घर मोडलं आहे, उद्या तुझा अहंकार मोडेल.” अशी एकेरी भाषा कंगनाने वापरली होती.

“ही वेळेची किमया आहे, लक्षात ठेवा… प्रत्येक वेळी वेळेचं चक्र सारखंच राहत नाही. आता मला वाटतं की, तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत. कारण मला माहित होतं की काश्मिरी पंडितांवर काय बेतलं असेल, आज मी त्याचा अनुभव घेतला आहे.” असंही कंगना म्हणाली होती.

“मी या देशाला आज वचन देते, मी फक्त अयोध्येवरच नाही, तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेन. त्यातून देशावासियांचे प्रबोधन करेन. कारण मला माहिती होतं, की हे होणार. माझ्यासोबत जे झालं त्याची काही कारणं आहेत, काही पार्श्वभूमी आहे. उद्धव ठाकरे हे क्रौर्य, ही दहशत आहे. बरं झालं हे माझ्यासोबत घडलं. याच्यामागे काही कारणं आहेत.” असे कंगना शेवटी म्हणाली. (Sanjay Raut On Kangana Ranaut issue)

संबंधित बातम्या :

बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’, कंगनाचे शरसंधान

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख