कुणी हातोडा, कुदळ, फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या, मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही, विनायक राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर

| Updated on: Mar 26, 2022 | 3:16 PM

शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे.

कुणी हातोडा, कुदळ, फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या, मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही, विनायक राऊत यांचं भाजपला प्रत्युत्तर
विनायक राऊत
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : शिवसेना (Shivsena) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरमध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपची बेळगावच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचा बंगला पाडणार असल्याचं म्हटलं होतं. किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांना कोल्हापूरमध्ये विचारलं असता त्यांनी कुणी हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असं म्हणत भाजपला आणि किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. याशिवाय विनायक राऊत यांनी भाजपचे आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याबद्दल ही वक्तव्य केलं आहे. नितेश राणे आणि निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित असल्याचं देखील विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना कुणी हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचं आहे ते घ्या पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार असल्याचं म्हटलंय. तर,नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासंदर्भात बोलताना त्यांना आम्ही फार किंमत देत नाही. नितेश राणे, निलेश राणे हे आमच्यासाठी संपलेलं गणित आहे, असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.

सीमाभागातील जनतेवर अत्याचार, भाजप नेते मूग गिळून बसलेत

बेळगावसह निपाणी कारवार येथील सीमाभागात मराठी जनतेवर अत्याचार सुरू आहे आणि महाराष्ट्रातील भाजप नेते मूग गिळून गप्प बसले आहेत.त्यामुळे विधानसभेत केलेला निषेधाचा ठराव योग्यच आहे. आम्ही देखील संसदेत याबाबत पत्र दिले त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत दुट्टपी धोरण दिसून येते, असं विनायक राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

VIDEO: कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस हातावर हात ठेवून बसणार नाही, shambhuraj desai यांचा सोमय्यांना इशारा

Disney+ Hotstar वर IPL 2022 चं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पाहणार? जाणून घ्या सब्सक्रिप्शन प्लॅन, किंमती आणि ऑफर्स