Disney+ Hotstar वर IPL 2022 चं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पाहणार? जाणून घ्या सब्सक्रिप्शन प्लॅन, किंमती आणि ऑफर्स

Disney+ Hotstar वर IPL 2022 चं लाईव्ह स्ट्रीमिंग कसं पाहणार? जाणून घ्या सब्सक्रिप्शन प्लॅन, किंमती आणि ऑफर्स
IPL - MI vs DC
Image Credit source: Disney Hotstar

IPL किंवा इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) ची सुरुवात 26 मार्च (आज) रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने होणार आहे.

अक्षय चोरगे

|

Mar 26, 2022 | 3:10 PM

मुंबई : IPL किंवा इंडियन प्रीमियर लीग 2022 (Indian Premier League 2022) ची सुरुवात 26 मार्च (आज) रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्याने होणार आहे. सर्व आयपीएल सामने डिजनी + हॉटस्टार (Disney+ Hotstar) आणि जिओ टीव्ही (JioTV) अॅपवर लाइव्ह स्ट्रीम केले जातील. त्यामुळे, जर तुम्ही क्रिकेट चाहते असाल आणि तुमच्याकडे टीव्ही किंवा केबल कनेक्शन नसेल, तर तुम्ही सर्व IPL सामने ऑनलाईन पाहण्यासाठी Disney+ Hotstar रिचार्ज प्लॅनची ​​मेंबरशिप घेऊ शकता. Disney+ Hotstar हा ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात तीन सबस्क्रिप्शन प्लॅन ऑफर करतो, ज्यात सुपर पॅक, प्रीमियम अॅन्युअल पॅक आणि प्रीमियम मंथली प्लॅन यांचा समावेश आहे.

Disney+ Hotstar चा 299 रुपयांचा प्लॅन एका महिन्यासाठी एकाच वेळी सर्व चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, चार डिव्हाइसेसवर स्पेशल अॅक्सेस देतो. या प्लॅनमध्ये तुम्ही 4K किंवा 2160 पिक्सेल व्हिडीओ क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 सपोर्ट मिळेल. या प्लॅनसह स्ट्रीम केलेले चित्रपट, शो, खेळ किंवा इतर कोणताही कंटेट जाहिरातमुक्त अनुभवासह (अॅड फ्री एक्सपीरियन्स) पाहता येईल.

899 रुपयांचा प्लॅन

Disney+ Hotstar चा 899 रुपयांचा प्लॅन सर्व चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्ही, दोन डिव्हाईसेसमध्ये एक वर्षासाठी एकाच वेळी अॅक्सेस देतो. हा प्लॅन फुल एचडी किंवा 1080 पिक्सेल व्हिडीओ क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 सपोर्टसह येतो. या प्लॅनसह सब्सक्रायबर्सना जाहिरातमुक्त अनुभव मिळत नाही. या प्लॅनसह ग्राहकांना सर्व कंटेंट जाहीरातींसह पाहावा लागतो.

1499 रुपयांचा प्लॅन

Disney+ Hotstar चा 1499 रुपयांचा प्लॅन ग्रहाकांना एका वर्षासाठी एकाच वेळी सर्व चित्रपट, लाइव्ह स्पोर्ट्स, टीव्हीचा एकाच वेळी चार डिव्हाइसेसवर अॅक्सेस देतो. यात 4K किंवा 2160 पिक्सेल व्हिडीओ क्वालिटीचा आणि डॉल्बी 5.1 सपोर्ट आहे. या प्लॅनसह स्ट्रीम केलेले चित्रपट, शो, लाईव्ह खेळ किंवा इतर कोणताही कंटेंट जाहिरातमुक्त अनुभवासह पाहता येईल.

Disney+ Hotstar सब्सक्रिप्शन कसे घेता येईल?

तीन डिस्ने+ हॉटस्टार प्लॅनपैकी कोणत्याही एकाचे सब्सक्रिप्शन घेण्यासाठी, तुम्ही थेट अधिकृत वेबसाइटला (https://www.hotstar.com/in/subscribe/get-started) भेट देऊ शकता

Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसाठी पैसे देऊ इच्छित नसल्यास, तुम्ही Jio, Vi किंवा Airtel प्लॅनची ​​निवड करू शकता जे OTT प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश देतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही Jio आणि Airtel प्लॅनची ​​यादी पाहू शकता जे एका वर्षासाठी मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देतात.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें