AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मातोश्रीवर अंतिम फैसला!! नाशिक पदवीधर निवडणूक; ठाकरे गटाचा शुभांगी पाटलांना पाठिंबा!

अखेर महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मातोश्रीवर अंतिम फैसला!! नाशिक पदवीधर निवडणूक; ठाकरे गटाचा शुभांगी पाटलांना पाठिंबा!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 14, 2023 | 3:12 PM
Share

दिनेश दुखंडे, मुंबईः नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मूळ उमेदवार ऐनवेळी पलटल्याने मोठी राजकीय गुंतागुंत झाली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून आज सकाळपासून राजकीय खलबतं सुरू होती. नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर नेत्यांमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरु होतं. आज अखेर ठाकरे गट अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

शुभांगी पाटलांना महाविकास आघाडीचा पाठिंबा?

उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळपासून मातोश्रीवर बैठक सुरु होती. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यादेखील आज मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना शुभांगी पाटील यांनाच पाठिंबा देणार, असं म्हटलं जात होतं.

मात्र महाविकास आघाडी शिवसेना समर्थित उमेदवाराला पाठिंबा देणार की नाही? की निवडणुकांवरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सध्या तरी नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार असून शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे.

शुभांगी पाटील कोण आहेत?

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापकदेखील आहेत. जळगावमधील गोपाळ बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.

सत्यजित तांबेंविरोधात सामना

नाशिक पदवीधर मतदार संघात शुभांगी पाटील यांचा सत्यजित तांबे यांच्याविरोधात सामना रंगणार आहे. सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वतीने अद्याप स्पष्ट वक्तव्य आलेलं नसलं तरीही फडणवीस यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे सत्यजित तांबे हे भाजप समर्थित उमेदवार असतील हे निश्चित आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठीशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष उभे असल्याचं चित्र आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच