उस्मानाबादमध्ये कार्टून वॉरनंतर आता एकमेकांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल

उस्मानाबाद : शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे वादात सापडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत कार्टून वॉरनंतर आता कथित वादग्रस्त क्लीपने उस्मानाबादच्या राजकारणात भूकंप झालाय. ओमराजे निंबाळकर यांच्या वादग्रस्त क्लिपमध्ये त्यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजीराव सावंत, विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना ‘शिवराळ’ भाषा वापरल्याचं दिसत आहे. तर खासदार गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या […]

उस्मानाबादमध्ये कार्टून वॉरनंतर आता एकमेकांच्या व्हिडीओ क्लिप व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

उस्मानाबाद : शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे वादात सापडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत कार्टून वॉरनंतर आता कथित वादग्रस्त क्लीपने उस्मानाबादच्या राजकारणात भूकंप झालाय. ओमराजे निंबाळकर यांच्या वादग्रस्त क्लिपमध्ये त्यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजीराव सावंत, विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना ‘शिवराळ’ भाषा वापरल्याचं दिसत आहे. तर खासदार गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 10 टक्के पैसे घेऊन कामे वाटप केल्याचा गंभीर आरोप केलाय. व्हायरल क्लिपवर विश्वास ठेवू नका, ती खोटी आहे, शिवसेनेतील मतभेद संपले असून विरोधकांचा हा डाव असल्याचा खुलासा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी सदरील क्लिप ही राजकीय फायदा घेण्यासाठी बनवली असल्याचा आरोप केलाय. क्लिपबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावरील क्लिप ही माझ्या आवाजाची डबिंग करून बनावट व्हिडिओ तयार करून बनविली असून यात डबिंग आवाजाच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख करून कटकारस्थान रचून बदनामी केल्याचा आरोप ओमराजे यांनी केला.

माझे वडील कै पवनराजे निंबाळकर यांनी 2004 मध्ये पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यावेळीही मतदानाच्या अंतिम टप्प्यात दैनिक जनप्रवास मध्ये ‘पवनराजे यांचा पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा’ अशा आशयाची खोटी बातमी छापून मतदारांची दिशाभूल करून निवडणूक जिंकली. याच घटनेची पुनरावृत्ती करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना फायदा होण्याच्या उद्देशाने ही बनावट क्लीप तयार केली, जेणेकरून शिवसेना नेत्यात आणि कार्यकर्त्यात अंतर्गत बंडाळी निर्माण व्हावी आणि त्याचा फायदा मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीला व्हावा. शिवसैनिक आणि कार्यकर्ते यांची दिशाभूल करण्यासाठी हे कटकारस्थान असल्याचा आरोप ओमराजेंनी केला.

ओमराजे यांच्या क्लिपनंतर शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी त्यांच्या घरात काम करणाऱ्या स्वयंपाकीला मारहाण केल्याची ‘आपबिती’ असलेली व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली. क्लीपमधील व्यक्ती हा त्याला घरात स्वयंपाक केला नाही म्हणून मारहाण केल्याचे आणि त्याला पगारही दिला नसल्याची कहाणी सांगत आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांनी सदरील क्लिपमधील व्यक्ती आपल्याकडे कामाला होती, मात्र त्याला आपण मारहाण केल्याचा प्रकार घडला नाही. हा कर्मचारी आपल्याकडे कामाला होता , तो खोटे बोलत असून षडयंत्राचा भाग आहे , त्याची आई आणि इतर लोक आमच्याकडे आजही कामाला आहेत. त्यांच्याकडे सत्याची शहानिशा करता येईल, असं अर्चना पाटील यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.