शिवसेनेची फौज सज्ज, 20 स्टार प्रचारकांची यादी तयार

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 15:28 PM, 27 Mar 2019

मुंबई : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. पहिल्या दोन टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदतही संपली. सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, आदेश बांदेकर, नितीन बानगुडे पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासह 20 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

शिवसेनेचे स्टार प्रचारक :

 1. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
 2. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे
 3. सुभाष देसाई
 4. दिवाकर रावते
 5. रामदास कदम
 6. संजय राऊत
 7. अनंत गीते
 8. आनंदराव अडसूळ
 9. एकनाथ शिंदे
 10. चंद्रकांत खैरे
 11. आदेश बांदेकर
 12. गुलाबराव पाटील
 13. विजय शिवतारे
 14. सूर्यकांत महाडिक
 15. विनोद घोसाळकर
 16. नीलम गोऱ्हे
 17. लक्ष्मण वडले
 18. नितीन बानगुडे पाटील
 19. वरुण सरदेसाई
 20. राहुल लोंढे

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.