ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

कोरोनासोबत जगायला शिका, असा संदेश देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा केलीय. जगासाठी हा निर्णय धोकादायक असल्याचं मत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलंय. | Britain Unlock Decision Dangerous to the world Saamana Editorial

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, 'त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक'
शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 6:46 AM

मुंबई : कोरोनासोबत जगायला शिका, असा संदेश देऊन ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा (Britain Unlock Decision) केली असली तरी कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझीलंडसारख्या (new Zealand ) देशाने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) न्यूझीलंडच्या सुरात सूर मिळसत ब्रिटनचा हा निर्णय धाडसी असला तरी तो आत्मघातकी ठरू शकतो. तसंच हा आत्मघात केवळ ब्रिटनपुरताच मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भविष्यवाणी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) केली आहे. (Shivsena Sanjay Raut Saamana Editorial On Britain Unlock Decision Dangerous to the world)

ब्रिटनचा निर्बंध हटविण्याचा निर्णय आत्मघातकी ठरु शकतो

एकीकडे कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरिएंट जगभरात धुमाकूळ घालतो आहे . त्यापाठोपाठ ‘ लॅमडा ‘ नावाचा नवीन कोरोना विषाणू दक्षिण अमेरिकेत आढळला आहे. कोरोनाचा मूळ विषाणू आणि डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ‘लॅमडा’ हा व्हेरिएंट अधिक प्राणघातक आहे. ब्रिटनमध्येही त्याचे काही रुग्ण आढळले आहेत, असे असतानाही मास्कसह सर्व निर्बंध हटवण्याचा ब्रिटनचा निर्णय आत्मघातकी ठरू शकतो.

कोरोना विज्ञानाला गुंगारा देतोय, लक्षणं बदलून नव्याने दाखल होतोय

जगभरात 40 लाखांहून अधिक बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूने आता जगाच्या कानाकोपऱ्यात आपले बस्तान कायमचे बसवले आहे, असेच दिसते. कॅन्सर, क्षयरोग, हृदयरोग हे आजार जसे पृथ्वीतलावर कायम निवासी बनून राहिले आहेत, तसेच कोरोनाही कायमचा जाण्यासाठी आलेला दिसत नाही. कोरोनाचा विषाणू आपले गुणधर्म बदलून, नवनवीन रूप धारण करून वैद्यक शास्त्राला आणि विज्ञानाला गुंगारा देत आहे. लक्षणे बदलून नव्या स्वरूपात दाखल होतो आहे. त्यामुळे कोरोनाची भीती बाळगून जगरहाटी आणखी किती वर्षे बंद ठेवायची यावर आता जागतिक पातळीवर मंथन सुरू झाले आहे.

कोरोनासोबत जगा हे ठीक, पण कोरोनाने जगू दिलं नाही तर…?

त्यातूनच ‘कोरोनासोबत जगायला शिका’ हा विचार बळावताना दिसतो आहे. पण कोरोनासोबत जगायचे म्हणजे नेमके काय करायचे आणि कोरोनाने जगू दिले नाही तर काय करायचे, याविषयी मात्र कोणीच बोलत नाही.

ब्रिटनमध्ये मास्कसह सर्व निर्बंध हटवले

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी तर 19 जुलैनंतर ब्रिटन पूर्णपणे ‘अनलॉक’ करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार ब्रिटनमधील सर्व व्यवहार आणि जनजीवन तर पूर्ववत सुरू होणार आहेच, पण त्यासोबतच मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग वगैरे सर्व निर्बंधही संपुष्टात येणार आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की, ब्रिटनमध्ये आजही 32 हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.

शिवाय कोरोनाच्या नव्या रूपातील डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्याही ब्रिटनमध्ये वाढते आहे. अशा स्थितीतही पंतप्रधान जॉन्सन यांनी 19 जुलैपासून देशातील सर्व निर्बंध हटवण्याचा निश्चय केला आहे. ब्रिटनचा हा निर्णय धाडसी असला तरी तो आत्मघातकी ठरू शकतो. पुन्हा हा आत्मघात केवळ ब्रिटनपुरताच मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण जगासाठी हे धाडस धोकादायक ठरू शकते.

जनतेला मुक्त संचाराची मोकळीक जगासाठी धोकादायक

चीनच्या एका शहरातून बाहेर पडलेला हा विषाणू हा हा म्हणता सातासमुद्रापलीकडे पोहचला. संपूर्ण जगच या विषाणूने व्यापून टाकले. कोटय़वधी लोकांना त्याची लागण झाली. 40 लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. ही सगळी भयंकर स्थिती डोळ्यासमोर असताना कोरोनाला रोखण्यासाठी निर्धारित करण्यात आलेले सर्व निर्बंध रद्द करून जनतेला मुक्त संचाराची मोकळीक देणे ही केवळ ब्रिटनसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकते.

सगळेच निर्बंध हटवणे हा जीवाशी खेळ

सततच्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड-दोन वर्षांत जगभरातील देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, व्यापार उद्योग बुडाले, बेरोजगारी वाढली. यातून मार्ग काढण्यासाठी जगरहाटी सुरू करणे आवश्यक आहे हे खरेच, पण त्यासोबत मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध संपूर्ण हटवणे हा जिवाशी खेळ ठरू शकतो. तरीही कोरोनामुळे सवा लाखांहून अधिक बळी गेलेल्या ब्रिटनने हा निर्णय घेतला.

कोरोनासंबंधी न्यूझीलंड सरकारची भूमिका काय?

कोरोनासोबत जगायला शिका असा संदेश देऊन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी संपूर्ण निर्बंध हटवण्याची घोषणा केली असली तरी कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करण्यात यशस्वी ठरलेल्या न्यूझिलंडसारख्या देशाने मात्र या भूमिकेला विरोध केला आहे. कोरोनामुळे न्यूझीलंडमध्ये केवळ 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंड सरकारने निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळेच तिथे कोरोनाचा उद्रेक झाला नाही.

त्यामुळेच ‘कोरोनासोबत जगा’ हे ब्रिटनचे धोरण आम्ही स्वीकारणार नाही आणि निर्बंधही हटवणार नाही, असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी स्पष्ट केलं. अचानक एका सकाळी उठून आजपासून कोविडच्या आधी होती तशी जीवनशैली सुरू करण्याची घोषणा करता येणार नाही अशी सावध भूमिका न्यूझीलंड सरकारने घेतली आहे.

(Shivsena Sanjay Raut Saamana Editorial On Britain Unlock Decision Dangerous to the world)

हे ही वाचा :

…तर मी अध्यक्ष होण्यास तयार, पण सेनेनं वनमंत्रिपद सोडू नये, भास्कर जाधवांचं वक्तव्य

‘सहकार विभाग राज्याच्या अखत्यारीत हवा, पूर्ण सहकार क्षेत्र भ्रष्ट बोलणं चुकीचं’, अजित पवारांची रोखठोक भूमिका

मोदींकडे पाहून जनतेने भाजप खासदारांना निवडलं, त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा त्यांचा निर्णय : अजित पवार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.