AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chaturvedi : ‘प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे…’ शीतल म्हात्रेंच प्रत्युत्तर

Priyanka Chaturvedi : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर टीका करताना खालची पातळी गाठली जात आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल एका प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून शीतल म्हात्रे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Priyanka Chaturvedi : 'प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे...' शीतल म्हात्रेंच प्रत्युत्तर
Priyanka Chaturvedi-Sheetal Mhatre
| Updated on: May 09, 2024 | 12:30 PM
Share

ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल एका प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सामना आहे. काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा नाहीय. काहीही करुन विजय मिळवणं हेच उद्दिष्ट आहे. प्रचार करताना प्रसंगी भाषेचा स्तर घसरतोय. सध्या दोन्ही बाजूंकडून परस्परांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. शाब्दीक हल्ले चढवताना प्रसंगी खालच्या पातळीवर टीका केली जातेय.

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईत एक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” असं त्या म्हणाल्या.

‘दीवार’ सिनेमाचा दाखला का दिला?

त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या ‘दीवार’ सिनेमाचा उल्लेख केला. ‘दीवार’ सिनेमात अमिताभ बच्चन त्याचा हात दाखवतो, ‘मेरा बाप चोर हैं’ असं त्यावर लिहिलेलं असतं, तसच श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उत्तर दिलय.

‘प्रियंका चतुर्वेदी आम्हाला ते बोलायला लावू नका’

“प्रियंका चतुर्वेदी यांनी डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला ते बोलायला लावू नका. तुम्ही खासदार कशा झाल्यात हे सुद्धा आम्हाला माहीत आहे” असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत