Article 370 | मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात…

| Updated on: Aug 05, 2019 | 2:12 PM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळे मी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही अभिनंदन करतो, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले."

Article 370 | मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात...
Follow us on

Jammu Kashmir LIVE  मुंबई : कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “आज खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. इतकी वर्षे देशातील प्रत्येक माणूस जे स्वप्न उराशी बाळगून होता ते पूर्ण झालं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचेही स्वप्न आज पूर्ण झाले. त्यामुळे मी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचेही अभिनंदन करतो, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.” मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

मोदी सरकारने जम्मू काश्मीरबाबत ऐतिहासिक पाऊल टाकलं. जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir Article 370) आता केंद्रशासित घोषित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर कलम 370 (Article 370) हटवून विशेषाधिकारही काढून टाकण्यात आले आहेत. याशिवाय जम्मू काश्मीरचं विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित राज्यांच्या निर्मितीची घोषणा केली. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात आहे मात्र लडाखमध्ये विना विधानसभा केंद्रशासित राज्य असेल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितलं.

त्याशिवाय “पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे कौतुक करताना आजही आपल्या देशात पोलादीपणा कायम आहे. हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. तसेच 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. मात्र आज (5 ऑगस्ट) आपला देश पूर्ण स्वतंत्र झाला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.”

इतकंच नव्हे तर जे विरोध करत असतील त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवा. पण देशाच्या सार्वभौमत्वाच्या बाबतीत कुठेही तडजोड होणार नाही याची आपण सगळे मिळून दक्षता घेऊ. तसेच हा निर्णय एखाद्या राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून तो देशाच्या एकसंघपणासाठी महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून या निर्णयाचे स्वागत आहे.

कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्याने शिवसेना आणि भाजपच्या वचननाम्यातील एक वचन पूर्ण झालं आहे.आज जर बाळासाहेब असते तर त्यांना याचा नक्कीच आनंद झाला असता. त्यामुळे सर्वांनी ही आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. असे मत उद्धव  ठाकरेंनी व्यक्त केले.

“तसेच जे या अनुषंगाने आदळ आपट करतील त्यांना सरकार बघेल असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.”

शिवसैनिकांचा जल्लोष

कलम 370 (Article 370) हटवून काश्मीरचे विशेषाधिकारही काढल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी शिवसेना भवन येथे फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तसेच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बर्फी वाटून साजरा केला. तसेच शिवसेना भवनाबाहेर ढोल वाजवून शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

कलम 370 हटवणार

मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची शिफारस राज्यसभेत केली. इतकंच नाही तर राज्याच्या पुनर्रचनेचाही प्रस्ताव अमित शाह यांनी मांडला. यानुसार लडाख हे जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्याचा प्रस्ताव आहे. अमित शाह हे जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 35 A रद्द करतील असे तर्क होते, मात्र त्यापुढे जाऊन, ज्या कलमांतर्गत जम्मू काश्मीरला विशेष दर्जा मिळाला आहे, ते कलम 370 हटवण्याचाच प्रस्ताव अमित शाहांनी ठेवला. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला राष्ट्रपतींचीही मंजुरी मिळाली.

जम्मू काश्मीरबाबतच्या 5 महत्वाच्या घटना

1) कलम 370 हटवल्याने विशेष अधिकार संपुष्टात

2) जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित राज्यांची निर्मिती

3) भारतीय संविधानातील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू

4) जम्मू काश्मीरची वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात

5) सर्वांना मालमत्ता खरेदी-विक्रीचा अधिकार

संबंधित बातम्या 

Article 370 | जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने काय होईल?  

Article 35 A | जम्मू काश्मीरमधील कलम 35 A हटवल्यास काय होईल?  

Jammu Kashmir LIVE : मास्टरस्ट्रोक! जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवणार : अमित शाह