काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्रातील 6 संभाव्य नावे

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस विविध राज्यातील उमेदवार याद्या जाहीर करत आहे. काँग्रेस आता आणखी एक यादी जाहीर करणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील नावांचा समावेश असेल. यापूर्वी पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 5  नावांचा समावेश होता. आता आणखी नावं जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे. काँग्रेसची उमेदवार संभाव्य नावे  …

काँग्रेसच्या यादीत महाराष्ट्रातील 6 संभाव्य नावे

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस विविध राज्यातील उमेदवार याद्या जाहीर करत आहे. काँग्रेस आता आणखी एक यादी जाहीर करणार आहे. या यादीत महाराष्ट्रातील नावांचा समावेश असेल. यापूर्वी पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 5  नावांचा समावेश होता. आता आणखी नावं जाहीर करणार आहे. महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. त्यापैकी काँग्रेस 26 आणि राष्ट्रवादी 22 जागा लढवणार आहे.

काँग्रेसची उमेदवार संभाव्य नावे 

नांदेड – अशोक चव्हाण

वर्धा – चारुलता टोकस

अकोला – डॉ. अभय पाटील

रामटेक – निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये

धुळे – कुणाल पाटील

यवतमाळ – माणिकराव ठाकरे

काँग्रेसने 13 मार्चला 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहीर झालेली काँग्रेसची पहिली पाच नावे 

नागपूर – नाना पटोले

गडचिरोली – नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

सोलापूर – सुशील कुमार शिंदे

काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीनुसार, महाराष्ट्रात दोन महालढती निश्चित झाल्या आहेत. पहिली लढत म्हणजे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले. दुसरी लढत ही सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्यात होईल. विशेष म्हणजे सोलापुरात सध्या भाजपचा खासदार आहे. त्यामुळे भाजपदेखील ही जागा सोडणार नाही. सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे.

नांदेडमध्ये अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हेच नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अशोक चव्हाणांऐवजी पत्नी आमदार अमिता चव्हाण यावेळी लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा होती. मात्र हायकमांडच्या आदेशानंतर अशोक चव्हाण स्वत: लोकसभा निवडणूक लढण्याची चिन्हं आहेत.

संबंधित बातम्या

वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर   

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *