Shrikant Deshmukh : श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश, पण पोलीस स्टेशनची वारी करावी लागणार, वाचा सविस्तर…
Shrikant Deshmukh : श्रीकांत देशमुख यांनी सदर बझार पोलीस स्टेशनला हजेरी लावली

सोलापूर : भाजपचे बडतर्फ सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण श्रीकांत देशमुख यांना दोन दिवस पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. त्यानुसार आज त्यांनी बझार पोलीस स्टेशनमध्ये आज हजेरी लावली. श्रीकांत देशमुख यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. श्रीकांत देशमुख या प्रकरणी अटक न करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत. मात्र पुढील सुनावणीपर्यंत त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याचे आदेश दिले गेले आहेत. ते पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी साफ नकार दिला. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेली झोड उठली. अटकेच्या भीतीने श्रीकांत देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली. यावेळी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्यासमोर झाली. त्यांनी श्रीकांत देशमुख यांना पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पारित केले.
अटक नाही पण पोलीस स्टेशनची वारी
श्रीकांत देशमुख यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेली झोड उठली. अटकेच्या भीतीने श्रीकांत देशमुख यांनी कोर्टात धाव घेतली. यावेळी केलेल्या अंतिम अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्यासमोर झाली. त्यांनी श्रीकांत देशमुख यांना पुढील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याचे आदेश पारित केले.
तुला एवढं बायकोचं प्रेम आहे तरीही…
व्हिडीओतील ज्या महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर आरोप केला आहे , त्यामध्ये ती महिला रडत असतानाच तिने फसवल्याचा आरोप श्रीकांत देशमुखांवर केला आहे. 28 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रुममध्ये ती महिला आणि श्रीकांत देशमुख असल्याचे दिसत असून त्या महिलेने आरोप केल्यानंतर तिच्याकडचा मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न श्रीकांत देशमुख करत आहेत असे दिसत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये महिलेने श्रीकांत देशमुखांना तुला एवढं बायकोचं प्रेम आहे तरीही आपल्याबरोबर तू खोटं बोलल्याचं त्या सांगत आहेत. आपल्याला फसवली गेल्याची भावना असल्यानेच महिलेने त्यामध्ये शेवटी श्रीकांत देशमुखांना तू बनणारच नाही आमदार असा तळतळाट दिला आहे. आणि हीच ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
