AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माढा विधानसभा मतदारसंघात होणार मोठी खेळी, धैर्यशील मोहिते पाटील देणार संजय मामा शिंदेंना धक्का

धैर्यशील मोहिते पाटील यांनी नारायण पाटील यांना सोबत घेऊन बाजार समितीच्या कार्यालयात जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

माढा विधानसभा मतदारसंघात होणार मोठी खेळी, धैर्यशील मोहिते पाटील देणार संजय मामा शिंदेंना धक्का
| Updated on: Aug 04, 2024 | 8:22 AM
Share

Solapur Madha Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आमदार संजय मामा शिंदे यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. त्यातच माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील हे एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर करमाळा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळयात विशेष लक्ष घातले आहे. सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे त्यांची संपूर्ण ताकद माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे आमदार संजयमामा शिंदे यांना धक्का देण्याची असल्याचे बोललं जात आहे.

जयवंतराव जगताप आणि नारायण पाटील एकाच व्यासपीठावर

माजी आमदार जयवंतराव जगताप आणि माजी आमदार नारायण पाटील यांना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जयवंतराव जगताप आपली ताकद नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करतील, अशी समीकरणे दिसत आहेत. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी करमाळयाची परीक्षा थोडी कठीण जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी परिश्रम घेतले. तर दुसरीकडे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. करमाळयातून महाविकासआघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे, याबद्दलचे संकेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले होते. त्यामुळे नारायण पाटील यांच्यासाठी आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी सूत्रे हलवायला सुरुवात केली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी नारायण पाटील यांना सोबत घेऊन बाजार समितीच्या कार्यालयात जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

जयवंतराव जगताप यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

या भेटीवेळी जयवंतराव जगताप यांनी नारायण पाटील यांच्याकडे पाहत करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यावेळी दोन सुवासिनी एकत्र येतात. त्यावेळी निश्चितच चांगला निकाल लागतो, असे सूचक विधान केले. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांना मदत करणारे जयवंतराव जगताप हे आगामी निवडणुकीत आपली भूमिका बदलण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जयवंतराव जगताप कोणाला मदत करतात. तोच करमाळयाचा आमदार होतो. कारण, जगताप यांच्याकडे मताचा एकगठ्ठा तो अटीतटीच्या लढतीत उपयोगही ठरतो. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी मागील विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभे राहिलेले जयवंतराव जगताप आता आपली ताकद माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीशी उभी करण्याची शक्यता आहे. जयवंतराव जगताप यांनी साथ सोडली, तर आमदार संजयमामा शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा कालावधी असला तरीही आतापासूनच राजकीय जुळवाजुळव सुरुवात झाली आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.