रजनीकांत स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीत करोडो प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajnikant launch new political party) लवकरच राजकारणात एण्ट्री करणार आहे.

रजनीकांत स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत करोडो प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajnikant launch new political party) लवकरच राजकारणात एण्ट्री करणार आहे. रजनीकांत पुढील वर्षात आपल्या नव्या पक्षाचीही स्थापना करणार आहे, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. रजनीकांतच्या (Rajnikant launch new political party) एण्ट्रीमुळे तामिळनाडूमधील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे.

रजनीकांत पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर 2020 पर्यंत आपल्या नवीन पक्षाची स्थापना करणार आहे. सध्या पक्षाच्या उद्दिष्टांवर काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. तसेच पक्षाची स्थापना केल्यानंतर रजनीकांत यांना नवी ओळख मिळू शकते, असं रजनीकांत यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे पुढच्यावर्षी पक्ष स्थापनेनंतर वर्ष 2021 मध्ये तामिळनाडूत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही रजनीकांत आपल्या पक्षाचे उमेदवार उतरवणार आहेत, असं लेखक तमिलरुवी मनियान यांनी सांगितले. दरम्यान, मनियान हे रजनीकांत यांच्या जवळचे मानले जातात.

द्रविडा मुन्नेत्रा काझगमचे(DMK) नेते एम करुणानिधी आणि ऑल इंडिया अन्ना द्रविडा मुन्नेत्रा काझगमचच्या (AIADMK) महासचिव जयललिता यांचे निधन झाल्यानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरुन काढण्यासाठी रजनीकांत नवीन पक्षाची स्थापना करणार आहे, असंही सांगितलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत DMK आणि AIADMK शिवाय भाजपचाही पराभव करणार आहे. माझ्या मते मजबूत आणि काम करणाऱ्या नेत्यासाठी तामिळनाडूमध्ये जागा आहे, असं मनियान म्हणाले.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांना भाजपचे सहयोगी म्हटले जात होते. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी रजनीकांत यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटले की, “माझे भगवेकरण कुणी करु शकत नाही”.

दरम्यान, तामिळनाडूमधील चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गद कलाकार केंद्र सरकारकडे तामिळनाडूसाठी काही महत्त्वाच्या मागण्या करणार आहेत. यामध्ये नदी जोड प्रकल्प, हायड्रोकार्बन प्रोजेक्ट रद्द करा, अशा मागण्यांचा समावेश आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *