रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पवार कुटुंबाला पहिला धक्का दिलाय. करारा संपूनही बारामतीसाठी सुरु असणारं पाणी माढ्याला वळवण्यात त्यांनी यश मिळवलंय.

रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 8:28 PM

मुंबई : भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारं निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. गिरीश महाजन यांनी याबाबत आदेश दिले असून येत्या दोन दिवसात लेखी आदेश निघणार आहेत. बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी आपल्या मतदारसंघात वळवण्याचं आश्वासन रणजितसिंह नाईकांनी दिलं होतं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 ला करार बदलत बारामतीला 60 टक्के पाणी दिलं होतं. 2017 मध्येच हा करार संपला होता. मात्र तरीही बारामतीला जाणारं पाणी सुरूच होतं. रणजितसिंह मोहिते पाटील आणि नवनियुक्त खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा करुन अखेर बारामतीचं पाणी वळवण्यात यश मिळवलंय.

पवार काका-पुतण्यांच्या निर्णयाला दोन्ही रणजितसिंहांनी शह दिलाय. निवडणुकीतही पाणी हा मुद्दा बनवण्यात आला होता. निवडून येताच रणजितसिंह नाईक कामाला लागले. अखेर बारामतीचं नियमबाह्य पाणी आता माढा मतदारसंघाला मिळणार आहे. नवनियक्त खासदार आणि मोहिते पाटील घराण्याचा पवारांना पहिला मोठा धक्का मानला जातोय.

बारामती आणि इंदापूरला निरा डाव्या कालव्याचं आवर्तन बंद केल्याने फार मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पाण्यासाठी संघर्ष होतोय की काय? पाण्यासाठी आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीतही पाण्याचा मुद्दाच गाजला होता. सांगलीतील काही भाग आणि माढा मतदारसंघातील काही तालुके नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतात.

काय आहे पाणी प्रश्न?

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्यातून 57 टक्के, तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचं धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरलं होतं. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होतं. डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होतं. 4 एप्रिल 2007 रोजी शरद पवार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 मध्ये पाणी वाटपाचा करार बदलला. त्यामध्ये निरा देवघर धरणातून 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंतचा करण्यात आला होता. करार संपल्यानंतरही हे पाणी बारामतीला जात होतं.

नियमबाह्य पाणी बंद करुन ते पुन्हा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यांना मिळावे अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी सोमवारी पुन्हा जलसंपदा मंत्री महाजन यांची भेट घेतली.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारं पाणी कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, निरा – देवघर या धरणातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला जाणारं पाणी कायमस्वरुपी बंद होऊन त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यांना 100 टक्के होणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.