मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता नाही, पण OBC आरक्षण गरजेचं, ते टिकवणं राज्यांच्या हातात, खासदार प्रीतम मुंडेंचं लोकसभेत वक्तव्य

ओबीसी आरक्षणासंदर्भातली आकडेवारी केंद्र सरकार दाखवत नाही, असा राज्य सरकारनं वारंवार आरोप करणं चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर कधीही ओबीसी जनगणना कधीही जाहीर झालेली नाही. तरीही राज्यात ओबीसी आरक्षण टिकून होतं, असं वक्तव्य खासदार प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत केलं.

मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता नाही, पण OBC आरक्षण गरजेचं, ते टिकवणं राज्यांच्या हातात, खासदार प्रीतम मुंडेंचं लोकसभेत वक्तव्य
खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेत वक्तव्य
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 3:51 PM

नवी दिल्लीः ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Reservation) टिकवून ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. याकरिता वारंवार केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याची गरज नाही, असा टोला खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी लोकसभेत (Loksabha) लगावला. मी कोणत्याही पक्षाची प्रवक्ता नाही, मात्र आरक्षण टिकवणं हे राज्याच्या हाती आहे, असं मत त्यांनी मांडलं. काल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court ) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अध्यदेशास स्थगिती दिली.

मी कोणत्याही पक्षाची प्रवक्ता म्हणून बोलत नाही…

ओबीसी आरक्षणासंदर्भातली आकडेवारी केंद्र सरकार दाखवत नाही, असा राज्य सरकारनं वारंवार आरोप करणं चुकीचं आहे. कारण स्वातंत्र्यानंतर कधीही ओबीसी जनगणना कधीही जाहीर झालेली नाही. तरीही राज्यात ओबीसी आरक्षण टिकून होतं. त्यावेळी ते का टिकून होतं, याचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की, राज्यकर्त्यांची मानसिकता ही मोठी भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यसरकारनं हा मुद्दा उचलून धरणं आणि ते आरक्षण टिकवणं ही काळाची गरज आहे. मी कुठल्या पक्षाची प्रवक्ता म्हणून बोलत नाहीये तर जे लाखो लोक आम्हाला इथं निवडून पाठवतात, त्यांच्या ओबीसी आरक्षणावर कुणीही घाला घालणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय ?

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्दीयांना 27 टक्के आरक्षण प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. आरक्षण देण्यासाठी आधी आयोगाची स्थापना करणे आणि त्यानंतर मनपानिहाय माहिती गोळा करणे ही दोन पावले या प्रक्रियेत उचलणे आवश्यक आहे. आपल्या राजकीय अपरिहार्यतेपोटी न्यायालयाचा निकाल मागे घेतला जाऊ शकत नाही. माहिती मिळेपर्यंत वाट पाहणे आवश्यक होते, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणाऱ्या अध्यादेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

इतर बातम्या-

Ankita Patil | हर्षवर्धन पाटील लेकीसह ‘शिवतीर्थ’वर, अंकिता पाटलांची राज ठाकरेंशी भेट

Gopichand Padalkar: बैलगाडी शर्यतीसाठी पुन्हा मैदानात उतरुन सरकारची पळता भुई थोडी करु, गोपीचंद पडळकरांचा इशारा

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.